Press "Enter" to skip to content

‘अमेरिकेचे हनुमानजी’ फोटोमागचे सत्य नेमके काय?

सोशल मीडियावर हनुमानाच्या एका मूर्तीचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की फोटो “Monkey God” या अमेरिकेच्या प्राचीन देवतेचा (monkey god hanuman) असून सध्या कोलोराडोच्या डेन्व्हर आर्ट म्यूजियममध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे.

Advertisement

सोबतच असाही दावा केला जातोय की संपूर्ण जगभरात सनातन हिंदू धर्म हा एकच धर्म होता, याचा यापेक्षा मोठा दुसरा कुठला पुरावा असू शकतो? 

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर देखील हा फोटो याच कॉपी पेस्ट दाव्यांसह शेअर केला जातोय.

अमेरिका के हनुमानजी– यह मूर्ति अमेरिका के प्राचीन देवता "Monkey God " की है । जो अब Colorado के Denver Art Musiam में…

Posted by भृगु पंडित on Saturday, 9 January 2021

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वप्रथम डेन्व्हर आर्ट म्युझियमच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली आसता तिथे आम्हाला हा फोटो सापडला.

Source: Denver Art Museum

वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, लाकडापासून बनविलेली ‘मंकी गॉड’ हनुमानाची (monkey god hanuman) ही मूर्ती 1800 सालच्या दरम्यान दक्षिण भारतातील तामिळनाडू किंवा केरळमधील एका अज्ञात शिल्पकाराने घडवलेली आहे.

मूर्तीमध्ये हिंदू वानर-देवता हनुमान दाखवले गेले आहेत, जे गुडघे टेकून भगवान रामाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. ही मूर्ती 1991 साली संग्रहालयाने खरेदी केली होती.

डेन्व्हर संग्रहालयाच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चच्या मदतीने अधिक शोध घेतला असता ‘फ्लिकर’ या फोटोस्टॉक वेबसाईटवर देखील हा फोटो अपलोड करण्यात आले असल्याचे आढळून आले.

Source: Flickr

या फोटोच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील सांगण्यात आले आहे की मूर्ती ‘मंकी गॉड’ची (हनुमान) असून मूर्तीचे मूळ भारतात आहे. लाकडापासून बनवलेली ही मूर्ती 1800 साली घडविण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल फोटोसोबत करण्यात आलेले दावे अर्धसत्य असून दिशाभूल करणारे आहेत.

व्हायरल मूर्ती प्राचीन अमेरिकन देवता ‘मंकी गॉड’ किंवा अमेरिकन हनुमानाची नसून हिंदू पुराणकथांमधील रामभक्त हनुमानाचीच आहे. मूर्ती 1800 साली केरळ किंवा तामिळनाडूतील अज्ञात शिल्पकाराने घडविली असून सध्या ती अमेरिकेतील कोलोराडोच्या डेन्व्हर आर्ट म्यूजियममध्ये आहे.

हे ही वाचा- अयोद्धेत ५००० वर्षे जुनं ‘राम मंदिर’ सापडलंय का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा