Press "Enter" to skip to content

जगातील सर्वात वृद्ध मानल्या जाणाऱ्या 201 वर्षीय तिबेटी बौद्ध भिक्खूचा हा फोटो आहे?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोसोबत दावा केला जातोय की हा फोटो जगातील सर्वात वृद्ध मानल्या जाणाऱ्या तिबेटी बौद्ध भिक्खूचा आहे. ते नेपाळच्या पर्वतांमध्ये सापडले असून त्यांचे वय 201 वर्ष आहे.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील साधारणतः अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा फोटो व्हायरल होतोय.

Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘टाईम्स नाऊ न्यूज’च्या वेबसाईटवर जानेवारी 2018 मध्ये प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला.

बातमीनुसार फोटो थायलंडमधील लुआंग फोर पियान (Luang Phor Pian) नामक बौद्ध भिक्खूचा आहे. त्यांचे नोव्हेंबर 2017 मध्ये बँकॉक येथे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले होते. ते मूळचे कंबोडिया येथील होते.

Source: Times Now

लुआंग फोर पियान यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे लोपबुरी येथील मंदिरात आपल्या अध्यात्मिक गुरुची सेवा करण्यात व्यतीत केली होती. पियान यांचा मृतदेह याच मंदिराच्या परिसरात पुरण्यात आला होता.

दरम्यान, मृत्यूनंतर बौद्ध प्रथेप्रमाणे जेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांचा मृतदेह शवपेटीतून बाहेर काढला, त्यावेळी ते चकित झाले. कारण बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते, असे देखील बातमीत सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की जगातील सर्वात वृद्ध मानल्या जाणाऱ्या 201 वर्षीय तिबेटी बौद्ध भिक्खूचा म्हणून व्हायरल होत असलेला फोटो थायलंडमधील लुआंग फोर पियान नामक बौद्ध भिक्खूचा आहे. त्यांचे 2017 मध्येच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालेले आहे.

बौद्ध परंपरेनुसार मृत्यूच्या काही दिवसांनंतर मृतदेह बाहेर काढण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसारच लुआंग फोर पियान यांचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला होता. सध्या व्हायरल होत असलेला फोटो त्याचवेळी घेण्यात आला होता.

हेही वाचा- उत्खननावेळी दर्ग्याखाली हिंदू देवता असलेल्या नंदीची मूर्ती सापडली?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा