Press "Enter" to skip to content

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहोम्मद युनूसला लष्कराच्या जवानांनी दिला चोप? वाचा सत्य!

राजस्थानमध्ये कथितरित्या पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) नावाच्या या व्यक्तीवर भारतीय लष्कराच्या नसीराबाद कॅन्टोन्मेंटची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. याच संदर्भाने आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये कुठल्याशा ठिकाणाहून काही मुस्लिम युवक बाहेर पडताना दिसताहेत आणि त्यांना सैन्याच्या गणवेशातील अधिकाऱ्यांकडून चोप दिला जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हे मुस्लिम युवक राजस्थानच्या अजमेरमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे मोहम्मद यूनुस,अहमद मौलाना आणि सद्दाम आहेत.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला एनडीटीव्ही इंडियाचे प्रतिनिधी अनुराग द्वारी यांच्या 17 एप्रिल 2020 रोजीच्या ट्विटमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओ मध्य प्रदेशातील रतलाम येथील आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून सामुहिकरित्या नमाज पठन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता वन इंडिया हिंदीच्या युट्युब चॅनेलवर देखील हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. “”कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत, परंतु काही लोक कोरोना संकटाचे गांभीर्य समजून घेण्यास तयार नाहीत. रतलाममधील अंकला रोडवरील मशिदीत सामूहिक नमाज पढताना काही लोकांना अटक करण्यात आली.” असे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. या व्हिडिओचा कथितरित्या पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहोम्मद युनूसशी काहीही संबंध नाही.

व्हिडीओ साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा असून कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करून सामूहिकरीत्या नमाज पढणाऱ्या लोकांवर करण्यात आलेल्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा- हिजाब विवाद: पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या बुरखाधारी दहशतवाद्यांना रंगेहात पकडण्यात आले?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा