Press "Enter" to skip to content

कौटुंबिक कलहातून झालेल्या मारामारीच्या व्हिडीओला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न!

व्हायरल व्हिडिओमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ती दिसतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ राजस्थानमधील असून मुसलमान व्यक्तीकडून हिंदू इसमास मारहाण करण्यात आली आहे. राजस्थानमधील या घटनेत एकाही आरोपीला पकडण्यात आलेले नाही, कारण आरोपी मुस्लिम धर्मीय आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार हे मुस्लिमांचे सरकार असल्याने आरोपींवर कारवाई केली जात नाहीये.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही गुगल किवर्डसच्या मदतीने व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दै. भास्करचा १९ सप्टेंबर रोजीचा रिपोर्ट मिळाला.  या रिपोर्टमधील फोटो व्हायरल फोटोतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीच्या फोटोशी मिळताजुळता आहे. रिपोर्टनुसार घटना राजस्थानच्या जोधपूरमधील मानसागर शिवपुरी या परिसरातील आहे. पीडित आणि आरोपी दोन्हीही एकाच समाजातील आहेत.

Dainik Bhaskar News
Source: Dainik Bhaskar

कौटुंबिक कलहातून झालेल्या वादात अजय, कंचन, शांति, कैलाश आणि कमलेश हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी मनोहरलाल, रविंद्र खींची, भरत, विशाल, संतोष, विकास, घनश्याम, देवीलाल, भवानी आणि पुखराज या आरोपींना अटक केली आहे.

सोशल मीडियावर सदर घटनेचा व्हिडीओ मॉब लिंचिंगच्या दाव्यांसह व्हायरल व्हायला लागल्यानंतर जोधपूर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या संबंधी ट्विट करत स्पष्टीकरण दिले होते. घटनेचा मॉब लिंचिंगशी काहीही संबंध नसून कौटुंबिक कलहातून झालेल्या वादातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. कौटुंबिक कलहातून झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतोय. व्हिडिओतील पीडित आणि आरोपी दोन्हीही हिंदू धर्मीय आहेत. यात कुठल्याही मुस्लिम व्यक्तीचा कसलाही संबंध नसून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

हेही वाचाहुक्का बारमधील छाप्यात मुस्लिम तरुणांसोबत १५ हिंदू तरुणी सापडल्याचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा