कॉंग्रेस पक्ष कसा मुस्लीम धार्जिणा आणि हिंदूविरोधी आहे हे पटवून देण्यासाठीच्या व्हायरल दाव्यांपैकी हा एक. संपूर्ण हिरव्या रंगात रंगवलेली, चंद्राचे चित्र असलेली इमारत राहुल गांधींच्या मतदारसंघातील, केरळच्या वायनाड मधील कॉंग्रेस कार्यालय ( Rahul Gandhi wayanad office) असल्याचे दावे सोशल मीडियातून जोरदार व्हायरल होतायेत.
व्हायरल दावा:
‘नहीं नहीं पाकिस्तान नहीं है यह… ऐसा तो सोचना भी महापाप है जी| यह तो वायनाड का कॉंग्रेस कार्यालय है, जहांसे राहुल गांधी सांसद है… इसे देखकर ही कम से कम सेक्युलीरीज्म का चोला ओढे हिन्दुओको अक्ल आ जानी चाहिये. (हालाकी इसकी उम्मीद कम ही है)
फेसबुक आणि ट्विटरवर हे दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी व्हॉट्सऍपवरही फॉरवर्ड होत असणाऱ्या या दाव्यांविषयी पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय आणि त्यावर राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा फोटो नाही. ना त्यावरील झेंडा कॉंग्रेस पक्षाचा दिसतोय यावरूनच हा फोटो फेक असल्याची शंका आली. म्हणून ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी केली त्यात समोर आलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे-
सर्वात आधी आम्ही व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिला. यातून आम्हाला त्याच इमारतीचा स्पष्ट फोटो मिळाला.
यात दिसणाऱ्या विविध बाबींची वस्तुस्थिती:
१. शिडी असलेले चिन्ह
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर शोधले असता ‘शिडी’ हे निवडणूक चिन्ह ‘Indian Union Muslim League‘ या पक्षाचे असल्याचे समजले. हा केरळमधील पक्ष आहे.
२. इमारतीवरील फोटो
आयोगाच्या माहितीनुसार जे पक्षाचे नाव मिळाले त्याच ‘IUML’ पक्षाचे संस्थापक सैद मुहम्मदअली शिहाब यांच्या फोटोशी इमारतीवरील फोटो तुलना करून पाहिला असता, तंतोतंत जुळला.
३. इमारतीवर लिहिलेला मजकूर
गुगल लेन्सच्या मदतीने ‘टेक्स्ट ट्रान्सलेट’ केले असता मल्याळम भाषेत ‘इक्बाल नगर लीग हाउस’ असे लिहिले असल्याचे समजले. म्हणजेच ते कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. वायनाड कॉंग्रेस कार्यालयाचा ( Rahul Gandhi wayanad office) म्हणून फिरत असलेला फोटो ‘IUML’ पक्षाच्या ‘इक्बाल नगर’ येथील कार्यालयाचा फोटो आहे.
हे ही वाचा: राहुल गांधींनी जनसामान्यांत जेवल्याचं दाखवण्यासाठी फोटोसेशन केलं, पण मास्क काढायचं विसरले?
Be First to Comment