Press "Enter" to skip to content

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा म्हणून हा फोटो शेअर करताय? थांबा!

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या पीडितेच्या मृत्यूने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर हाथरस पीडितेला (hathras rape victim) न्याय मिळवून देण्यासाठी कॅम्पेन चालवले जाताहेत. त्यात हाथरसच्या क्रूर घटनेतील पीडितेचा म्हणून एका मुलीचा फोटो शेअर करण्यात येतोय.

Advertisement
facebook post about Hathras Gang rape checkpost marathi 1
Source: Facebook

अर्काइव्ह पोस्ट

facebook post about Hathras Gang rape checkpost marathi 2
Source: Facebook

अर्काइव्ह पोस्ट

ट्विटरवर मेजर सुरेंद्र पुनिया यांनी आपल्या व्हेरीफाईड अकाउंटवरून हा फोटो शेअर करत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. 

Tweet about Hathras Gang rape checkpost marathi
Source: Twitter

पडताळणी:

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या (hathras rape victim) माध्यमांमधील उपलब्ध फोटोंशी व्हायरल फोटोची तुलना केली असता दोन्ही फोटो वेगवेगळ्या मुलींचे असल्याचे लगेच लक्षात येते. त्यामुळे व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही काही किवर्डसह गुगल सर्च केलं असता ‘इंडिया टुडे’च्या वेबसाईटवर एक बातमी मिळाली.

बातमीनुसार व्हायरल फोटो हाथरस प्रकरणातील पीडितेचा नसल्याचं पीडितेच्या भावाकडून स्पष्ट करण्यात आलंय. शिवाय फोटोतील मुलगी आपल्या परिचयातील नसल्याचं देखील पीडितेच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय.

व्हायरल फोटोतील मुलगी नेमकी कोण हे शोधण्याच्या प्रयत्न केला असता आम्हाला एक फेसबुक पोस्ट मिळली. सदर पोस्टकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये व्हायरल फोटोतील मुलगी आपली बहीण असून तिचा २ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय. हा फोटो हाथरस प्रकरणाशी जोडून शेअर केला जात असून तसं न करण्याची विनंती पोस्टकर्त्याने केली आहे.

Ajay Yadav appeal on facebook to tell she is his sister checkpost marathi
Source: Facebook

व्हायरल फोटोतील मुलीचा दोन वर्षांपूर्वी उपचारातील निष्काळजीपणामुळे चंदिगढ येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. त्याविरोधात पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याने आपण सोशल मीडियावर ‘जस्टीस फॉर मनीषा’ अभियान चालवलं होतं, असं या फेसबुक पोस्टमध्ये सांगण्यात आलंय.

आम्ही पोस्टकर्त्या युजरची फेसबुक प्रोफाइल स्कॅन केली असता २५ जुलै २०१८ रोजी या अकाऊंटवरून आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी ‘जस्टीस फॉर मनीषा’ कॅम्पेन चालवलं गेलं असल्याचं आढळून आलं.

Ajay Yadav 2018 post to demand justice for her sister checkpost marathi
Source: Facebook

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर हाथरस प्रकरणातील पीडितेचा म्हणून शेअर केला जात असलेला फोटो दुसऱ्याच मुलीचा आहे. संबंधित मुलीचा २ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे.

हाथरस प्रकरणातील पीडिता आणि व्हायरल फोटोतील पीडित मुलीच्या नावातील सारखेपणामुळे सोशल मीडियावर हाथरस घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या कॅम्पेनमध्ये दुसराच फोटो शेअर करण्यात येतोय.

हे ही वाचा- ‘सिरिया’तील लहान मुलांच्या मृतदेहांना भारतीय म्हणत पसरवल्या जात आहेत अफवा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा