Press "Enter" to skip to content

मेट्रो ब्रिज कोसळल्याचे व्हायरल फोटोज पुण्याचे नाहीत, मग कुठले ते जाणून घ्या!

रायगडमध्ये इमारत कोसळली त्याच दिवसापासून सोशल मीडियातून, विशेषतः व्हॉट्सऍपवरून मेट्रो ब्रिज कोसळल्याचे काही फोटोज व्हायरल होताहेत. ही घटना पुण्यातील विमान नगरच्या फिनिक्स मॉल जवळ घडल्याचे (metro bridge collapse pune) दावे करण्यात येत आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी व्हायरल मेसेज आणि फोटोज आमच्या 9172011480

Advertisement
या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर फॉरवर्ड करून निदर्शनास आणून दिली.

हेच फोटोज पोस्ट करत सदर घटना मुंबईच्या मालाड भागातील असल्याचे दावे सुद्धा काहींनी केले होते.

Metro bridge collapse near phoenix mallMalad mumbai

Posted by Nasir Shaikh on Monday, 24 August 2020

केवळ पुणे-मुंबईच नाही, तर काहींनी हा कोसळलेला ब्रिज बंगळुरूच्या के आर पुरम येथील असल्याचे सांगितले.

K R Puram – Whitefield Metro bridge broken near Phoenix Mall

Posted by Ramesh Venka on Tuesday, 25 August 2020

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी अशी काही घटना घडल्याची बातमी आहे का हे तपासण्यासाठी काही कीवर्ड्स टाकून सर्च केले असता दैनिक सकाळची एक बातमी समोर आली.

‘वडगावशेरी परिसरातील फिनिक्स मॉलजवळ मेट्रो पूल कोसळल्याचे फोटोज (metro bridge collapse pune) व्हायरल झाले होते. याविषयी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अशी काही घटना तेथे घडली नसून ही अफवा नेमकी कुणी पसरवली याचा शोध घेतला जात असल्याचे समजले’ अशी माहिती या बातमीत देण्यात आली होती.

याचाच अर्थ ही घटना पुण्यातील नाही, हे स्पष्ट झाले होते. मग घटना नेमकी कुठली हे तपासण्यासाठी आम्ही व्हायरल फोटोज गुगल लेन्सच्या सहाय्याने रिव्हर्स सर्च करून पाहिले. त्यावेळी फोटोजशी साधर्म्य साधणारी दृश्ये असणारा एक व्हिडीओ आम्हाला सापडला.

ANI या वृत्तसंस्थेने युट्युबवर २२ ऑगस्ट २०२० रोजी अपलोड केलेल्या या व्हिडीओनुसार ती घटना हरियाणातील गुरूग्राम येथे घडली आहे. या घटनेत दोन लोक जखमी झाले आहेत.

बातमीतील माहितीनुसार कीवर्ड्स टाकून सर्च केल्यानंतर आम्हाला इंडिया टुडेची बातमी सापडली. यामध्ये सदर घटनेविषयी विस्तृत माहिती असून बातमीत PTI या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने वापरलेले फोटोज आणि व्हायरल झालेले फोटोज तंतोतंत जुळताहेत.

Source: India TV/PTI

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सदर घटना घडल्या घडल्या लगेच त्याविषयी माहिती देणारे ट्विट केले होते. ‘नॅशनल हायवे ऑथोरीटी ऑफ इंडिया’ची टीम आणि उपविभागीय दंडाधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत अशी माहिती दिली होती.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की पुणे, मुंबई, बंगळूरू अशा वेगवेगळ्या शहरांमधील मेट्रो ब्रिज कोसळल्याचे दावे करणारे मेसेज फेक आहेत.

मेट्रो ब्रिज कोसळल्याची घटना खरी असून ती हरियाणा मधील गुरूग्राम येथे घडली आहे.

हेही वाचा: रेल्वे खात्यात वेल्डर पासून कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ५२८५ जागांवर भरतीची जाहिरात फेक!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा