भारताच्या लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक, गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून पंतप्रधान पदापर्यंतचा वादग्रस्त प्रवास आणि माध्यमांतून कधी टोकाचा विरोध तर कधी टोकाचे समर्थन मिळणारे व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून आजवर विविध ‘फेकन्यूज’ पसरवल्या गेल्या. (narendra modi fake news) त्यातीलच महत्वाच्या ‘फेक न्यूज’ची, एडीट केलेल्या फोटोज-व्हिडीओजची, खोट्या दाव्यांची पोलखोल करणारा हा स्पेशल रिपोर्ट.
- दावा: लेह आर्मी हॉस्पिटलमध्ये मोदींनी घेतलेली सैनिकांची भेट केवळ फोटोशूट साठी केलेला ‘ड्रामा’!
पंतप्रधान मोदींनी ३ जुलै रोजी ‘लेह आर्मी हॉस्पिटल’ला भेट दिली आणि सैनिकांशी संवाद साधला. परंतु ‘हे सर्व नाटक आहे, हे काही हॉस्पिटल नाही. हॉस्पिटलमध्ये पोडीयम, प्रोजेक्टर कुठे असतो का? सैनिक जर रुग्णशय्येवर आहेत तर त्यातील एकाच्याही हाताला सलाईन का दिसत नाहीये? बेड्सच्या आजूबाजूला वैद्यकीय उपकरणे सुद्धा नाहीत.’ असे अनेक विरोधकांनी दावे केले होते. त्यात कॉंग्रेसचे ‘नॅशनल मिडिया पॅनेल’चे सदस्य अभिषेक दत्त, कॉंग्रेसचेच नेते श्रीवत्स आणि सलमान निझामी यांच्यासह इतर अनेक विरोधकांनी या संबंधी ट्विट केले होते.
वस्तुस्थिती:
ते हॉस्पिटल नसून कॉन्फरन्स हॉल आहे हे खरे परंतु हा केवळ फोटोशूट साठी केलेला ड्रामा नव्हता. कोव्हीड१९ मुळे सैनिकांच्या विलगीकरणासाठी हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर ठिकाणांवर बेड्स टाकले आहेत. या कॉन्फरन्स हॉलमध्ये १०० बेड्स टाकले आहेत. हे सैनिक जखमी वगैरे नसून केवळ त्यांना विलगीकरणात ठेवलेले होते. मोदींच्या काही दिवस आधी सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे सुद्धा सैनिकांना भेटले. ते सुद्धा याच हॉलमध्ये. त्याचा पुरावा म्हणून २३ जूनचे ट्विट उपलब्ध आहे.
सर्व आरोपांचे खंडन करत ‘संरक्षण मंत्रालयाने’ परिपत्रक जारी केले होते आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये बेड्स टाकण्याचे कारण कोव्हीड१९ सांगितले होते.
- दावा: पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांच्या समोरच ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा!
चक्रीवादळानंतर पाहणीनिमित्त पश्चिम बंगालभेटी दरम्यान हेलिकॉप्टरकडे जाताना पंतप्रधान मोदींच्या समोरच जनतेने ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरूनसुद्धा हा व्हिडीओ याच दाव्यांसह शेअर केला गेला होता.
वस्तुस्थिती:
सदर व्हिडिओ एडीट केलेला आहे. व्हिडीओच्या ओरिजिनल ऑडीओमध्ये ‘जय श्रीराम’ ‘दीदी’ असे नारे दिले आहेत. आकाशवाणीने तो मूळ ऑडीओसह असलेला व्हिडीओ ट्विट केलेला आहे. किंबहुना यात आपण व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो.
व्हायरल व्हिडीओला जोडलेला ऑडीओ, ज्यात ‘चौकीदार चोर है’ घोषणा दिल्या आहेत तो बंगळुरूमध्ये भाजपा रॅलीच्या वेळी कॉंग्रेस समर्थकांनी दिलेल्या घोषणांचा आहे. ‘टाईम्स ऑफ इंडियाने’ तो व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलाय.
- दावा: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत नरेंद्र मोदींचा जुना फोटो
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे भाऊ दीपक निकाळजे यांना शिवसेना-भाजपच्या महायुतीचा भाग असणाऱ्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ने विधानसभेचे तिकीट दिले होते. त्यावेळी काही जुने फोटोज व्हायरल करण्यात आले होते. यामध्ये नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि छोटा राजन असल्याचे दावे केले गेले होते. यातून नरेंद्र मोदींचा अंडरवर्ल्ड डॉनशी जुना सलोखा सल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने २०१४ मध्ये पब्लिश केलेल्या बातमीत मोदींच्या जुन्या अमेरिका भेटीचा उल्लेख आहे. १९९३ मध्ये जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरेश जानी मोदींच्या स्वागतासाठी गेले होते तेव्हाचा मूळ फोटो आहे. व्हायरल फोटोत मूळ फोटोतील डाव्या बाजूच्या वृद्ध गृहस्था ऐवजी छोटा राजनचा फोटो एडीट करून (narendra modi fake news) लावण्यात आला आहे.
- दावा: महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला अभिवादन करताना नरेंद्र मोदी
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या माथेफिरू नथुराम गोडसेच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर हात जोडून अभिवादन करताना नरेंद्र मोदी असे दावे करत एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
वस्तुस्थिती:
गुगल रिव्हर्स इमेज सर्च मध्येच लक्षात येईल की ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’ने ६ एप्रिल २०१७ रोजी पब्लिश केलेल्या बातमीनुसार सदर फोटोत नथुराम गोडसेचा पुतळा नसून तो पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३८व्या वर्धापनदिनानिमित्त सोहळा पार पडला होता, त्यावेळचा हा फोटो आहे.
- दावा: मुलाखतीमध्ये मोदी स्वतः सांगतायेत की माझं फक्त शालेय शिक्षण झालं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यात ते स्वतः कबूल करताना दिसताहेत की त्यांचं केवळ शालेय शिक्षण झालं होतं. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले. सोशल मीडियातील इतर युजर्सप्रमाणेच कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया हेड ‘दिव्या स्पंदना’ यांनीही हा व्हिडीओ शेअर केला होता. ‘बड़ी मुश्किल से विडियो ढूंढा है, ये 1998 का इन्टरव्यू है जिसमे साहब खुद कह रहे है हाई स्कूल तक पढा हूँ, लेकिन आज साहब के पास ग्रेजुएशन की डिग्री है जो 1979 मे किया था !!’ अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता.
वस्तुस्थिती:
सदर व्हिडीओ अर्धवट कट केलेला आहे. या वक्तव्यानंतर मोदी असे सांगताहेत की “बाद में हमारे संकेत अधिकारी थे, उनके बडे आग्रह पर मैने एक्स्टर्नल एक्जाम देना शुरू किया. तो दिल्ली युनिव्हर्सिटीसे मैने बी.ए. कर लिया एक्स्टर्नल एक्जाम दे करके. फिर भी उनका आग्रह रहा तो मैने एम.ए कर लिया एक्स्टर्नल एक्जामसे. मैने कभी कॉलेज का दरवाजा देखा नहीं. फिर भी मै युनिव्हर्सिटीमें पेहला आ गया”
व्हिडीओ अर्धवट कट केलेला आहे समजल्या नंतर ‘दिव्या स्पंदना’ यांनी व्हायरल व्हिडीओ फेक (narendra modi fake news) असल्याचे सांगत ‘अल्ट न्यूज’च्या फॅक्टचेक रिपोर्टची लिंक ट्विट केली होती.
संपूर्ण उत्तर ऐकण्यासाठी लिंक:
- दावा: लहान मुलाचे कान ओढणारे मोदी आणि हुकुमशहा हिटलर मध्ये साम्य
नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने लहान मुलाचे कान ओढताहेत त्याचप्रमाणे एका लहान मुलीचे कान ओढताना हुकुमशहा हिटलरचा फोटो शेअर करून दोघांतील साम्य दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हे ट्विट सुद्धा कॉंग्रेस सोशल मिडिया हेड ‘दिव्या स्पंदना’ यांनीच केले होते.
वस्तुस्थिती:
‘द सन‘च्या २०१७च्या एका रिपोर्टमध्ये हिटलरचा मूळ फोटो आहे. त्यामध्ये एका लहान मुलीसोबत हिटलरचे विविध फोटोज आहेत, त्यापैकीच एक ज्यात त्याने मुलीच्या खांद्यावर हात ठेवले आहेत. या फोटोला एडीट करून मोदींचेच हात कानाजवळ लाऊन मोदी आणि हिटलर यांच्यात साम्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
साभार- या रिपोर्टमधील वेगवेगळ्या दाव्यांच्या संकलनासाठी अल्ट न्यूज, बूम लाईव्ह आणि टाईम्स ऑफ इंडियावर वेळोवेळी प्रसिद्ध बातम्यांचे साहाय्य लाभले आहे.
- या प्रमुख व्हायरल दाव्यांशिवाय गेल्या सहा महिन्यात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी विविध फेकन्यूज पसरवल्या होत्या. त्यांची ‘चेकपोस्ट मराठी’ने केलेली पडताळणी वाचण्यासाठी थेट शीर्षकावर क्लिक करा:
- पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यासाठी कॉंग्रेस वापरतेय ८ वर्षे जुना फोटो!
- पंतप्रधान मोदींचा पंडित जवाहरलाल नेहरूंना झुकून नमन करतानाचा व्हायरल फोटो एडिटेड!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हिंदुराष्ट्रासाठी योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करणारं व्हायरल पत्र फेक !
- नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी वापरला चुकीच्या विमानाचा फोटो!
- नरेंद्र मोदींचा जिनपिंग यांच्यासमोर झुकून नमस्कार करतानाचा फोटो फेक!
- उद्योगपती गौतम अदाणींच्या पत्नीला झुकून नमस्कार करत असल्याचा फेक दावा व्हायरल !
- नरेंद्र मोदींचा जिनपिंग यांच्यासमोर झुकून नमस्कार करतानाचा फोटो फेक!
[…] नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पे…September 17, 2020 Leave a Comment […]
[…] हे ही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पे… […]
[…] नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पे… […]