Press "Enter" to skip to content

‘शिवनाग’ वृक्षाचे मूळ कापल्यानंतर १५ दिवस हालचाल करते? जाणून घ्या सत्य!

अद्भुत, चमत्कारिक, अनाकलनीय अशा प्रत्येक गोष्टीला ‘दैवी’ म्हणण्याचा आपला स्वभाव आहे. याच स्वभावामुळे सोशल मीडियात हलणाऱ्या ‘शिवनाग’ वृक्षाच्या मुळांचा (shivnag roots) व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हॉट्सऍपवरही लोक या व्हिडिओला मनोभावे फॉरवर्ड करताहेत.

Advertisement

‘शिवनाग वृक्षाची मुळे आहेत.तोडल्यानंतर ही मुळ सुकायला 10 ते 15 दिवस लागतात. तोपर्यंत अशीच वळवळत रहातात हे बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून पोस्ट केलंय’

या मजकुरासह व्हॉट्सऍपवर फिरत असलेला व्हिडीओ ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ऋषिकेश होशिंग आणि प्रवीण सागर यांनी निदर्शनास आणून दिला.

ट्विटरवर अनेकांनी याच दाव्यासह हिंदी, मराठी कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला आहे. ‘दिनेश मिश्रा’ यांच्या ट्विटला जवळपास ७३५ लोकांनी रीट्विट केले आहे.

अर्काइव्ह लिंक

फेसबुकसुद्धा या व्हायरल दाव्यांना अपवाद नाही. बाळासाहेब भामरे या युजरने सदर व्हिडिओ अशाच कॅप्शनसह पोस्ट केलाय.

*शिवनाग वृक्षाची मुळे आहेत.तोडल्यानंतर ही मुळ सुकायला 10 ते15 दिवस लागतात. तोपर्यंत अशीच वळवळत रहातात* हे बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून पोस्ट केलंय

Posted by Balasaheb Bhamre on Saturday, 26 September 2020

अर्काइव्ह लिंक

फेसबुकवर हा व्हिडीओ किती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय याचा अंदाज आपणास खालील स्क्रिनशॉटचा कोलाज पाहून लक्षात येईल.

shivnag root viral posts on fb checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचकांनी व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून दिल्या नंतर आम्ही या ‘शिवनाग’ वृक्षाबद्दल माहिती मिळवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु अशा नावाचा वृक्ष असल्याची ठोस माहिती कुठे मिळाली नाही.

पडताळणी दरम्यान काही ट्विटर युजर्सनी व्हायरल दाव्यांना मोडीत काढत हे कुठल्या वृक्षाचे मूळ नसून ते ‘हॉर्सहेअर वर्म’ असल्याचे स्पष्ट केले. ही माहिती मिळाल्यानंतर एका ट्विटर युजरने चुकीची गोष्ट पसरवल्याबद्दल माफी मागितली आणि स्वतःच या ‘हॉर्सहेअर वर्म’ बद्दल माहिती दिली.

याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढे तपास करताना आम्हाला ‘मल्याळम समयम’ या पोर्टलचा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार ‘केरळा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट पिची, त्रिशूर’ येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. सुजानापालन यांनी हे कुठल्या वृक्षाचे मूळ नसून ‘हॉर्सहेअर वर्म’ असल्याचेच स्पष्ट केले.

काय आहे ‘हॉर्सहेअर वर्म’?

‘हॉर्सहेअर वर्म’ हा परपोशी जीव आहे. तो रातकिडा, नाकतोडा अशा कीटकांच्या शरीरात राहतो आणि त्यांच्या जीवावर जगतो. किड्याच्या बाहेर ते केवळ पाण्यात जगतात. म्हणून पूर्णतः वाढ झाल्यानंतर त्यांना किड्याबाहेर यावं वाटतं त्यावेळी त्यांना पाण्याची गरज असते.

रातकिडे सहसा पाण्यात जात नाहीत, यावेळी हे ‘हॉर्सहेअर वर्म’ किड्यात अशा पद्धतीने बदल घडवून आणतात की तो पाण्यात जाईल. जसा किडा पाण्यात जातो, तसे हे वर्म्स बाहेर येऊ लागतात. एका किड्यात एकापेक्षा अधिक वर्म राहू शकतात. त्यांची लांबी रुंदी वेगवेगळी असू शकते.

खालील व्हिडीओत आपणास त्या वर्मबद्दल अधिक माहिती मिळेल.

पूर्णतः वाढ झालेल्या ‘वर्म्स’च्या झुपक्याकडे पाहिल्यानंतर खात्री होईल की हे तेच आहेत ज्यांना ‘शिवनाग’ वृक्षाचे मूळ (shivnag roots) म्हणून खपवलं जात आहे.

पूर्णतः वाढ झालेले ‘हॉर्सहेअर वर्म’:

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये ‘शिवनाग’ वृक्षाचे मूळ (shivnag roots) नसून ते परपोशी वृत्तीचे ‘हॉर्सहेअर वर्म’ आहेत.

प्रत्येक चमत्कृतीपूर्ण गोष्टीला दैवी म्हणून अंधपणे विश्वास ठेवण्यापेक्षा त्यामागील विज्ञान शोधण्याचे कुतुहूल जागे असावे. आपणही याच वृत्तीचे असाल तर ‘चेकपोस्ट मराठी’च्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा!

हेही वाचा: ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामागे चमत्कार नसून विज्ञान आहे!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा