Press "Enter" to skip to content

मक्का मदिनातील खऱ्या ‘मक्केश्वरनाथ शिवलिंगाचे’ दर्शन घडले आहे?

सोशल मीडियात काही फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल होतायेत. दावा केला जातोय की ‘इतिहासात पहिल्यांदाच मक्का मदिनातील शिवलिंगाचे दर्शन (Makka Madina Shiv Mandir) घडलेय, हिंदुनो जोरदार शेअर करा आणि जगाला सत्य दाखवा!’

Advertisement

‘इतिहास में पहली बार मक्का मदिना का शिवलिंग दिखाया गया है. हिंदू भाई चुके नही शेअर जरूर करे.’ अशा कॅप्शनसह एक फोटो असलेला स्क्रिनशॉट फेसबुकवर जोरदार व्हायरल होतोय.

FB posts claiming shivling in makkah madina_ Check Post Marathi fact
Source: Facebook

#शेयरकरें मक्का मदीना पर इनके बनाए वीडियो को देखिए इनकी असलियत सामने आ जाएगी जिन मक्केश्वर नाथ शिवलिंग की सैटेलाइट इमेज प्रमाणित है जिनके पौराणिक साक्ष्य हैं जिनके प्रमाण तमाम विश्व के पुरातत्वविद मानते हैं उन्ही महादेव की ये पूजा कर रहे है !’ या कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला जातोय.

#शेयरकरें मक्का मदीना पर इनके बनाए वीडियो को देखिए इनकी असलियत सामने आ जाएगी जिन मक्केश्वर नाथ शिवलिंग की सैटेलाइट इमेज…

Posted by Aditya krishna giri- president international hindu sena on Sunday, 27 June 2021
अर्काइव्ह

फेसबुकप्रमाणेच ट्विटर आणि व्हॉट्सऍपवर देखील हे दावे व्हायरल होत आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अमरदीप पवार यांनी व्हायरल दाव्यांची माहिती देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • व्हायरल दाव्याचे कॅप्शन वाचल्यास दावा करणाऱ्यांचे ‘सामान्य ज्ञान’ किती ‘अतिसामान्य’ आहे हे लक्षात येईल. सदर दृश्य खरे जरी असले तरीही ते एक तर मक्केत असेल किंवा मदिनेत असेल; कारण ही दोन्ही वेगवेगळी शहरे असून दोन्हीतील अंतर साधारण साडे चारशे किलोमीटर आहे.
  • दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला तेव्हा काही फोटोज, व्हिडीओज समोर आले. त्यातीलच एक युट्युब व्हिडीओद्वारे असे समजले की व्हायरल फोटोत दिसणाऱ्या भागास यास ‘रुक्न-ए-यमनी’ असं म्हणतात.
  • इस्लाम मध्ये महत्वाच्या मानल्या गेलेल्या तीर्थस्थळांपैकी असलेल्या मक्केच्या पवित्र मशिदीतील चौरस आकाराची ईमारत म्हणजे ‘काबा’. या इमारतीला काळ्या रंगाच्या आवरणाने झाकलेले आहे. इमारतीस थेट स्पर्श करता यावा म्हणून उघडा ठेवेलेला कोपरा म्हणजे ही ‘रुक्न-ए-यमनी’ जागा.
  • इमारतीच्या चारही कोपऱ्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत प्रत्येकाचे महत्व आणि त्यामागची कथा वेगवेगळी आहे.
The names of the 4 corners of the Kabah
Source: Islamic Landmarks
  • असे म्हणतात की ही जागा म्हणजे स्वर्गाचे द्वार आहे. येथे ‘फरिश्ता’ उभा असतो. त्या जागेजवळ जाऊन मनातली इच्छा बोलून दाखवल्यास तेथील फरिश्ता ‘आमेन’ म्हणतो. म्हणून यास हात लावण्यासाठी, त्याचे चुंबन घेण्यासाठी झुंबड उडते.
  • सौदी गॅझेट‘ या वेबसाईटवर आपणास ‘काबा’ आणि तिचा कोपरा व्यवस्थित पहायला मिळेल.
corner of kabba check post marathi fact check
Source: Saudi Gazette

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल इमेज आणि व्हिडीओमध्ये दिसत असलेला आकार शिवलिंगासारखा भासत असला तरीही ते शिवलिंग नसून ‘काबा’ इमारतीचा कोपरा आहे.

एकदा हे पण वाचून पहा:

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा