Press "Enter" to skip to content

‘लहान मुलांना ‘5G’ ट्रायलमुळे धोका आहे, फोन बंद ठेवा’ म्हणत व्हायरल होणारे मेसेज निराधार!

‘5G’ नेटवर्कची ट्रायल होणार असल्यामुळे आपला मोबाईल लहान मुलांकडे देऊ नका, आपला मोबाईल बंद करून ठेवा. मानवी जीवनाला याचा धोका (5g testing dangerous) आहे असे दावे करणारा एक मेसेज आणि त्यासोबत ‘ABP न्यूज’च्या बातमीची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय.

Advertisement

व्हायरल मेसेज:

‘उद्या संध्याकाळी 10 वाजल्यापासून 12 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत कृपया विनंती आहे की आपला मोबाईल लहान मुलांकडे देऊ नका व आपणही त्याचा वापर करू नका कारण उद्यापासून 5G इन्स्टॉलेशन म्हणजेच 5G नेटवर्क ची ट्रायल घेणार आहेत त्यामळे मानवी जीवनाला आणि लहान मुलांना याचा धोका आहे म्हणून आपला मोबाईल बंद ठेवाल तेवढं आपल्या कुटुंबासाठी चांगलं आहे’

*उद्या संध्याकाळी 10 वाजल्यापासून 12 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत कृपया विनंती आहे की आपला मोबाईल लहान मुलांकडे देऊ नका व आपणही त्याचा वापर करू नका कारण उद्यापासून 5G इन्स्टॉलेशन म्हणजेच 5G नेटवर्क ची ट्रायल घेणार आहेत त्यामळे मानवी जीवनाला आणि लहान मुलांना याचा धोका आहे म्हणून आपला मोबाईल बंद ठेवाल तेवढं आपल्या कुटुंबासाठी चांगलं आहे**👇खालील व्हिडीओ पहा.*

Posted by Siddharth Barde on Tuesday, 11 May 2021

अर्काइव्ह लिंक

या व्हायरल दाव्यांत सदर खबरदारी १२ तारखेला सकाळी ९ वाजेपर्यंतच घ्या असे सांगितले असूनही सदर मेसेज आणि व्हिडीओ क्लिप व्हॉट्सऍपवर अजूनही फॉरवर्ड होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी निदर्शनास आणून दिले.

Source: Whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणीत समोर आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे-

  • ‘ABP न्यूज’चा तो व्हिडीओ २०१२ सालचा

सर्वात आधी आम्ही ‘ABP न्यूज’च्या त्या बातमीच्या क्लिपची पार्श्वभूमी तपासली. गुगलवर ऍडव्हान्सड् कीवर्ड्सच्या मदतीने सर्च केले असता ‘ABP न्यूज’च्याच अधिकृत युट्युब चॅनलवरून ११ सप्टेंबर २०१२ रोजी हा व्हिडीओ अपलोड झाला असल्याचे दिसले.

  • भारताने २०१२ साली EMF लिमिट कमी केली होती

वृत्तनिवेदकाने सांगितल्यानुसार मोबाईल वापराच्या खबरदारीविषयीच्या या सूचना सरकारने दिल्या आहेत. २०१२ साली नेमके कशाच्या पार्श्वभूमीवर हे सल्ले दिले गेलेत हे तपासताना ‘डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम’चे एक पत्रक आम्हाला सापडले. यानुसार १ सप्टेंबर २०१२ रोजी भारत सरकारने EMF (Electro Magnetic Field) लिमिट आधीपेक्षा १/१० पटीने कमी ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या संबंधीच्या पत्रकात मोबाईलधारकांनी काय काळजी घ्यावी याविषयी सल्ले दिले होते. त्याविषयीची ही ABPने केलेली बातमी.

  • 5G टेस्टिंग अजून चालू झाली नाही

भारतात अजून 5G सेवेची सुरुवात झालेली नाही. दूरसंचार मंत्रालयाकडून 4 मे 2021 रोजी 13 दूरसंचार कंपन्यांना देशात 5G टेस्टिंग करण्याची परवानगी दिली आहे. न्यू इंडिया एक्स्प्रेसच्या बातमीनुसार सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले आहे की सध्या देशात 5G टेस्टिंग सुरु नाही आणि 5G टॉवर देखील बसविण्यात आलेले नाहीत.

  • 5G रेडीएशन्सचा लहान मुलांना त्रास होईल का?

विज्ञानानुसार रेडीएशन्सचे फ्रिक्वेन्सी लेव्हलनुसार दोन प्रकार पडतात ‘आयोनायझिंग’ आणि ‘नॉन-आयोनायझिंग’. खालच्या चित्रात आपण पाहू शकता रेडीओ, टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल, मायक्रोवेव्ह या उपकरणांपासून ते सूर्याच्या किरणांपर्यंतची फ्रिक्वेन्सी ज्या रेडीएशन्सची आहे त्यांना ‘नॉन-आयोनायझिंग’ असे म्हणतात.

Part I | The hype about 5g | Islands' Sounder
Source: islandssounder

हे रेडीएशन्स मानवाला तितके घातक नाहीत जीतके ‘आयोनायझिंग’ फ्रिक्वेन्सी लेव्हलमध्ये येणारे X-Ray, UV Ray आणि Radio Active Sources मधील किरणे असतात. म्हणूनच गरज नसताना सतत X-Ray किंवा सीटी स्कॅन करू नका, त्याने कॅन्सर होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगत असतात.

CNET‘च्या लेखात नमूद केल्यानुसार ‘5G फ्रिक्वेन्सी’ अर्थातच ‘नॉन-आयोनायझिंग’मध्येच येत असली तरीही आपण वापरत असलेल्या 3G-4G पेक्षा जवळपास ५ पट ताकदवान आहे. WHOने ‘नॉन-आयोनायझिंग’ रेडीएशन्सला सुद्धा ‘Possibly Carcinogenic’ म्हणजेच कॅन्सर होण्याची शक्यता असणारे घटक निर्माण करणारा असे म्हंटले आहे. याविषयी वैज्ञानिकांचे परस्परविरोधी मत आहे. तरीही बहुतांश तज्ज्ञांच्या मते आणि रिसर्चनुसार 5G रेडीएशन्सचा लहान मुलांना किंवा मानवजातीला काही धोका (5g testing dangerous) असल्याचे सबळ पुरावे नाहीत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार व्हायरल दावा निराधार आहे. 5G नेटवर्क टेस्टिंगला भारतात अजून सुरुवात झाली नाहीये. दाव्यासोबत व्हायरल होत असलेला व्हिडीओ २०१२ सालचा असून त्यात दिलेले सल्ले केवळ ११ आणि १२ मे दरम्यानच नव्हे तर सामान्यपणे दैनंदिन आयुष्यात सुद्धा वापरण्यास हरकत नाही.

WHO आणि तज्ज्ञांच्या मते आणि रिसर्चनुसार 5G रेडीएशन्सचा लहान मुलांना किंवा मानवजातीला काही धोका असल्याचे सबळ पुरावे अजूनतरी उपलब्ध नाहीत.

हे ही वाचा:

भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रसारास 5G टेस्टिंग जबाबदार आहे का?

गुजरातमध्ये लोकांनी ‘5G टॉवर’ जाळल्याचा दावा करणारा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा