Press "Enter" to skip to content

इंदौरमध्ये भर रस्त्यावर तरुणीला चाकुचा धाक दाखवणारा तरुण मुस्लिम नाही!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यावर एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बघायला मिळतेय. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौरमधील असून मुस्लिम तरुण हिंदू तरुणीला धमकावत असल्याचे सांगितले जातेय. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा दावा देखील केला जातोय.

Advertisement

व्हायरल दावा:

यह देखो लव जिहादी हिंदू बच्चियों को केसे डरा धमका कर अपने जाल में फंसाते है. अगर किसी भी बच्ची को कोई भी इस प्रकार से धमकाए तो डरने की जरूरत नही है तुरंत अपने घर वालो को जानकारी देकर पुलिस में रिपोर्ट दर्ज कराए*तो यह लोग अपने मकसद में कामयाब नही हो पाएंगे

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता दैनिक ‘भास्कर’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. भास्करच्या बातमीनुसार सदर घटना इंदौरमधील जगजीवन राम नगर येथील आहे. व्हिडिओमध्ये तरुणीला चाकूचा धाक दाखवणाऱ्या आरोपीचे नाव पीयूष उर्फ शानू असे आहे.

जगजीवन राम नगरजवळ सोनी मटेरियल नावाच्या दुकानासमोर आरोपी सदर तरुणीस धमकावत होता. त्याचवेळी जमलेल्या लोकांनी व्हिडीओ शूट केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीयूष उर्फ शानू कछावा हा व्हिडिओतील आपल्या कथित प्रेयसीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणात पीडित तरुणी किंवा तिच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार देण्यात आलेली नसल्यामुळे पोलिसांकडून आरोपीवर केवळ शस्त्रास्त्र कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

‘न्यूज 18 हिंदी’च्या वेबसाईटवर देखील या घटनेसंदर्भातील बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार पोलिसांना आरोपीच्या ताब्यातून चोरीचे वाहनही सापडले आहे. पोलिसांकडून आरोपीचा इतर गुन्ह्यातही सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये चाकूने तरुणीला धमकवणारा तरुण मुस्लिम नाही. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेतले असून त्याने पोलिसांसमोर आपल्या कथित प्रेयसीवर लग्नाचा दबाव टाकण्यासाठी तीला धमकावण्याचा प्रयत्न केल्याची कबूली दिली आहे. आरोपीचे नाव पीयूष उर्फ शानू आहे.

हेही वाचा- ‘लुलू मॉल’मध्ये नमाज पठण प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हिंदू धर्मीय आहेत? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा