Press "Enter" to skip to content

हिजाब विवाद: राहुल गांधींसोबत दिसणारी ती महिला व्हायरल व्हिडिओतील मुस्कान नाही!

कर्नाटकातील शिमोगा येथे हिजाब घातल्यामुळे हिंदुत्ववादी जमावाने लक्ष्य केल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या कर्नाटकातील मुस्कान खान (Muskan Khan) हिच्यासंदर्भात अनेक उलट-सुलट दावे सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एका महिलेसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. दावा केला जातोय की फोटोत राहुल गांधींसह दिसणारी ती महिला मुस्कान आहे. मुस्कान काँग्रेसशी संबंधित असून काँग्रेसकडून देशात फूट पडण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसच्याच आशीर्वादाने हे सगळं सुरु आहे.

‘इसके बाद भी क्या कोई भ्रम बचता है कि ये परिवार देश का सबसे बड़ा शत्रु है। पहचाना इस कन्या को? हिजाब वाली शेरनी…! फूट डालो शासन करो कि नीति’ अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

अनेक युजर्सकडून ‘कोयी बतायेगा!? राहुल के साथ यह कौन लड़की है?’ असा प्रश्न उपस्थित करत अप्रत्येक्षरीत्या ती मुस्कान असल्याचा दावा केलाय.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र आंग्रे आणि धीरज भोसले यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. फेसबुकवर देखील अनेकांकडून राहुल गांधी यांच्यासह दिसणारी मुलगी मुस्कान असल्याचा दावा करण्यात आलाय.

FB virals to claim muskan with Rahul gandhi
Source: Facebook

पडताळणी:

राहुल गांधी यांच्यासह दिसणारी ती मुलगी कोण, या प्रश्नाचं उत्तर खुद्द त्या मुलीनेच दिलंय. फोटोत राहुल गांधींसोबत दिसणाऱ्या त्या महिलेचं नाव अंबा प्रसाद आहे. अंबा प्रसाद या झारखंडमधील बरकागाव येथील काँग्रेसच्या आमदार आहेत.

अंबा प्रसाद यांनी फोटोत राहुल गांधींसह दिसणारी महिला मुस्कान खान असल्याचा दावा करणाऱ्या एका ट्विटर युजरला रिप्लाय देत फोटोत दिसणारी महिला आपण असल्याचं सांगितलंय.

हा फोटो कर्नाटकच्या बुरख्यातल्या मुलीच्या संदर्भाने शेअर केला जात असून द्वेष पसरविण्याचं काम केलं जात आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आमच्या पक्षात सर्वांना सन्मान आणि अधिकार दिला जातो. मग ते भगवे वस्त्र असो किंवा हिजाब, असं अंबा प्रसाद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय.

अंबा प्रसाद यांनी 8 फेब्रुवारी रोजी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला होता. फोटोच्या कॅप्शनुसार राहुल गांधींनी झारखंडमधील काँग्रेसचे खासदार, आमदार आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीला संघटनेचे प्रभारी केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, सहप्रभारी उमंग सिंगर देखील उपस्थित होते. इंस्टाग्रामवरही त्यांनी हा फोटो पोस्ट केला होता.

amba prasad with Rahul Gandhi instagram pic
Source: Instagram

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधींसोबत दिसणारी महिला मुस्कान खान नसून त्या झारखंडमधील काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद आहेत.

हेही वाचा- व्हायरल फोटोज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर ‘अल्लाहू अकबर’चे नारे दिलेल्या मुलीचे नाहीत! व्हायरल दावे फेक!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा