Press "Enter" to skip to content

गोळ्यांच्या कॅप्सूलमध्ये खिळे? धक्कादायक व्हायरल व्हिडीओचे सत्य काय?

नव्या कोऱ्या औषधी गोळ्यांच्या पाकीटातून काढलेल्या कॅप्सूलमध्ये चपलेसाठी वापरल्या जाणाऱ्या चुका आणि लोखंडी खिळे (iron nails in capsule) निघाल्याचे दर्शवणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

काही ठिकाणी या व्हिडीओला धार्मिक रंग देण्यात आलाय. जिहादी लोक हिंदूंना मारण्यासाठी अशाप्रकारचे उद्योग करत असल्याचा दावा आहे.

मार्च महिन्यात फेसबुक, ट्विटर सारख्या माध्यमांत बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ आता व्हॉट्सऍपवर फिरत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिल पाटील, निसार अली आणि प्रवीण सागर यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Source: Facebook

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की हा व्हिडीओ दोन वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप्स जोडून बनवलेला आहे.
  • त्यासंबंधी कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता युट्युबवर जास्त स्पष्ट आणि मोठा व्हिडीओ मिळाला.
  • यामध्ये दिसत असलेल्या गोळ्यांच्या पाकिटावरील कंपनीचे नाव पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला असता त्यावर ‘सिटी फार्मासुटीकल लॅबरोटरीज’ असे नाव आढळले. या कंपनीविषयी गुगलवर शोधाशोध केली असता ही पाकिस्तानातील कराची येथील असल्याचे समजले.
Screenshot shows tablet manufacturer
  • बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की एका स्ट्रीपच्या एका रांगेत २ अशा चार रांगा मिळून ८ गोळ्या आहेत परंतु पाकिटावर ‘१४ टॅब्लेट’ असे लिहिले आहे. एका पाकिटात २ स्ट्रीप असल्याचे जरी गृहीत धरले तरीही एकूण १६ गोळ्या होतात. हे तर्कात बसत नाही.
Esoral tablet count marking
  • Esoral या गोळीविषयी सर्च केले असता Eskayef Pharmaceuticals Ltd या बांग्लादेशी कंपनीचे मूळ उत्पादन आहे. परंतु व्हायरल व्हिडीओतील पाकिटावर कुठेही या कंपनीचा उल्लेख नाही. महत्वाचे म्हणजे या कंपनीची उत्पादने भारतात विकले जात नाहीत.
  • व्हायरल व्हिडीओतील दुसऱ्या क्लिपचे सत्य शोधण्यासाठी आम्ही कीवर्ड सर्च केल्यानंतर त्यासंबंधीचा मोठा व्हिडीओ सापडला.
  • या व्हिडीओतून त्या गोळीचे नाव ‘Enterofuryl 200 mg’ असल्याचे समजले. याविषयी शोधाशोध केली असता Bosnalijek नावाच्या कंपनीचे हे उत्पादन असल्याचे लक्षात आले.
  • Bosnalijek ही कंपनी बोस्निया, सराजेवो आणि हर्जेगोविना येथे कार्यरत आहे. परंतु या कंपनीची उत्पादने ज्या देशांत विकली जातात त्यात भारताचा उल्लेख नाही.
  • या व्हायरल व्हिडीओज विषयी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पूर्वीच रिपोर्ट्स केले आहेत आणि संबंधीत शासकीय संस्थाना यावर चौकशी करण्याची विनंतीही केली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओतील गोळ्या, त्यांची पाकिटे आणि कंपनी या संबंधीची माहिती कुठेही जुळत नाही. जनसामान्यांत भीतीचे वातावरण तयार करण्याकरिता मुद्दामहून कुणाचा हा खोडसाळपणा असल्याचे जाणवते.

संबंधीत कंपन्यांकडून या दोन्ही व्हायरल व्हिडीओज विषयी अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आल्याचे अद्यापपर्यंत तरी आढळलेले नाही. मात्र गोळ्यांच्या कॅप्सूलमध्ये लोखंडी खिळे (iron nails in capsule) सापडल्याचा दावा करणाऱ्या या दोन्हीही व्हिडीओजचा भारताशी काहीएक संबंध नाही एवढं नक्की.

हेही वाचा: मोबाईलवर खुपवेळ गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ नावाचा किडा होत असल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा