Press "Enter" to skip to content

समुद्र किनाऱ्यावरील महिलांना वाहून नेणाऱ्या लाटांचा व्हिडिओ मुंबईतील नाही! वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने जमलेले लोक आणि खवळलेला समुद्र बघायला मिळतोय. खवळलेल्या समुद्रातील काही लाटा किनाऱ्यावर येताहेत आणि या लाटांसोबत दोन महिला वाहून जात असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडिओ मुंबईतील वांद्रे किनाऱ्यावरील असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘अल अराबिया’ या अरबी न्यूज चॅनेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 12 जुलै 2022 रोजी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.

अल अराबियाच्या ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ओमानमधील मुगसेल बीचवरील दुर्घटनेचा आहे. कुटुंबातील आठ सदस्यांनी समुद्रकिनाऱ्याची सीमा ओलांडल्यानंतर एका महाकाय लाटेत एक कुटुंब वाहून गेल्याचे या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

आम्हाला एनडीटीव्ही इंडियाच्या युट्यूब चॅनेलवर या घटनेसंदर्भातील बातमी देखील बघायला मिळाली. बातमीनुसार या दुर्घटनेत राज्याच्या सांगली जिल्ह्यातील शशिकांत म्हमाने यांच्यासह त्यांची 9 वर्षांची मुलगी श्रुती आणि 6 वर्षाचा मुलगा श्रेयस यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

शशिकांत हे दुबईतील एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत होते. ते ईदच्या सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबासह ओमानला फिरायला गेले होते. मुलांना वाहून जाताना बघून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात शशिकांत देखील समुद्राच्या लाटेसह वाहून गेले.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठीच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ मुंबईतील नाही. व्हिडीओ ओमानमधील मुगसेल बीचवरील दुर्घटनेचा आहे. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यतील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचामाळेगाव घाटातील दरड कोसळल्याचा म्हणून ‘झी २४ तास’ने चालवला आसाममधील व्हिडीओ!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा