Press "Enter" to skip to content

लसीकरणाच्या वेळी फक्त सुई टोचून बाहेर काढणाऱ्या नर्सचा व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही

‘लस घेताना लक्षात ठेवा नक्की लस दिली जात आहे की नाही’ या सल्ल्यासह एका नर्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये सदर व्यक्तीच्या दंडात ती नर्स केवळ सुई टोचून बाहेर काढत आहे. शरीरात लस इंजेक्ट होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

“व्हाक्सीन चोरी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर पहा पेशनटला माघे कोपऱ्यात एक साईटला कोपऱ्यात घेतले आहे,इतरांना दिसू नये म्हणून नर्स फक्त टोचते आणि सुई काढते नळीत औषध मागून प्रेस केलं जातं नाही, आणि लगेच सफेद पट्टी लावली जाते माघे कुणाला दिसू नये म्हणून एक डॉक्टर नर्स सोबत आडवा उभा राहतो,
अरे काय चाललंय काय ?”

Advertisement
असा मजकूर आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात खूप मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतोय.

व्हाक्सीन चोरी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर पहा पेशनटला माघे कोपऱ्यात एक साईटला कोपऱ्यात घेतले आहे,इतरांना दिसू नये म्हणून नर्स फक्त टोचते आणि सुई काढते नळीत औषध मागून प्रेस केलं जातं नाही, आणि लगेच सफेद पट्टी लावली जाते माघे कुणाला दिसू नये म्हणून एक डॉक्टर नर्स सोबत आडवा उभा राहतो,अरे काय चाललंय काय ? चोरों से सावधान

Posted by Tookiram S Vaidya on Saturday, 24 April 2021

अर्काईव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जेकब डीकुन्हा, विजय चौधरी आणि दयानंद यांनी व्हॉट्सऍपवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वात आधी व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या.

सदर व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यास/ऐकल्यास लक्षात येईल की प्रथमदर्शनीच यातील नर्स आणि रुग्ण दोहोंचीही चेहरेपट्टी, रंगरूप आणि त्यात वापरलेली भाषा भारतीय असल्याचे जाणवत नाही. आम्ही जेव्हा रिव्हर्स इमेज सर्च केले तेव्हा आम्हाला एक ट्विट सापडले, ज्यात हा व्हिडीओ आणि काही मजकूर होता.

‘सॅन्ड्रा इकवेरीया’ या मेक्सिकन अभिनेत्रीने हे ट्विट केले आहे. यातील मजकूर स्पॅनिश भाषेतील आहे. ते ट्रान्सलेट केल्यानंतर मजकुराचा अर्थ समजला. यात त्यांनी असे लिहिले आहे की

“हे कृत्य अनपेक्षित आहे. IMSS ज्या लोकांनी हा असा लशीसोबत भ्रष्टाचार केलाय त्यांना शिक्षा द्या. त्या नर्सला जे जे सामील आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई करा.”

या ट्विटमध्ये सॅन्ड्रा यांनी IMSS या ट्विटर हँडलला टॅग केले आहे. हे हँडल ‘Mexican Institute of Social Security’ या संस्थेचे आहे. या संस्थेचा व्हायरल व्हिडीओशी काय संबंध? हे तपासण्यासाठी आम्ही किवर्ड्सच्या आधारे सर्च केले. त्यात ‘Aristegui Noticias‘ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवरील बातमी सापडली.

बातमीनुसार IMSS ही मेक्सिकन शासनाची सार्वजनिक आरोग्य सांभाळणारी संस्था आहे. याच संस्थेअंतर्गत ३ एप्रिल रोजी National Polytechnic Institute, Mexico City या ठिकाणी लसीकरणादरम्यान घडलेला हा प्रकार आहे.

घडल्या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरातून कारवीच्या मागण्या होऊ लागल्या. यावर IMSSने ४ एप्रिल २०२१ रोजी ट्विट केले आहे. स्पॅनिश भाषेतील या ट्विटचा अनुवाद:

नॅशनल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या नॅशनल स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस येथे काल लसीकरण सत्रादरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल एसईडीईएसए आणि आयएमएसएस दोहोंना खेद वाटत आहे. या संदर्भात दोषींवर कारवाई केली जाईल आणि जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी येथून पुढे आरोग्य कर्मचार्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की लसीकरणाच्या वेळी फक्त सुई टोचून बाहेर काढणाऱ्या नर्सचा व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून मेक्सिकोचा आहे.

नाशिक येथील डॉ. सूर्यशील मते यांना स्वतः लस घेतेवेळी असाच काहीसा अनुभव आल्याचा मोठा मेसेजसुद्धा सोशल मीडियात व्हायरल होतोय. त्यातील मजकुरानुसार सिरींजमध्ये लस न भरताच नर्स त्यांना इंजेक्शन टोचू लागली होती. मते यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी कारवाईची मागणी केली. या व्हायरल मजकुराच्या सत्यतेविषयी पडताळणी करण्यासाठी मते यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन बंद आहे. सदर घटना खरी असो वा नसो, लस घेते वेळी आपण स्वतः जागरूकतेने सर्व प्रोसेसकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे.

पहिल्यावेळी ज्या कंपनीची लस घेतली त्याच कंपनीची लस आपल्याला दुसऱ्या डोसमध्ये मिळत आहे ना? सुई नवी आहे ना? सिरींजमध्ये आपल्यासमोरच लस भरली आहे ना? याची खात्री करूनच लस टोचून घेण्यास होकार द्या.

हे ही वाचा: मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेणं नुकसानकारक ठरू शकतं का?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा