Press "Enter" to skip to content

‘तो’ फोटो अयोध्या रेल्वे स्टेशनचा असल्याचे दावे फेक; परंतु फोटो भारताशीच संबंधित! वाचा सत्य!

एका अलिशान रेल्वे प्लॅटफॉर्म्स असणाऱ्या रेल्वे स्टेशनचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की ते अयोध्या येथील रेल्वे स्टेशन (Ayodhya railway station) आहे.

Advertisement

‘ये है आयोध्या का रेलवे स्टेशन औंर कितना विकास चाहिये आप लोगो को जैसे पेरिस दिख रहा है.’ अशा कॅप्शनसह तो फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

 • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिले असता तो फोटो असणाऱ्या विविध राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांच्या बातम्या आम्हाला सापडल्या.
 • ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’च्या २२ जून २०२० रोजी प्रसारीत झालेल्या बातमीनुसार रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिल्ली रेल्वे स्टेशनला विमानतळासारखे रुपडे देण्यासाठी ६५०० कोटी रुपये मंजूर केले होते.
 • या नुतनीकरणात प्रवाश्यांना स्टेशनमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग असतील, मल्टी लेव्हल कार पार्किंग असेल, विमानतळाप्रमाणे फूड कोर्ट, रेस्ट रूम इत्यादी सुविधा असतील असे बातमीत नमूद केले आहे.
 • याच रेल्वे स्टेशनचे प्रस्तावित कल्पना चित्र म्हणून दोन फोटोज बातमीत लावले आहेत. त्यापैकी एक फोटो सध्या अयोध्या रेल्वे स्टेशन (Ayodhya railway station) म्हणून व्हायरल होतोय.

दिल्ली रेल्वे स्टेशनचे छताचे प्रस्तावित चित्र:

Delhi railway station proposed revamped roof pic.jpg

दिल्ली रेल्वे स्टेशनचे प्रस्तावित चित्र:

Delhi railway station proposed revamped pic.jpg
 • इंडियन एक्स्प्रेस‘च्या ३ ऑगस्ट २०२० रोजी प्रसारित झालेल्या बातमीनुसार अयोध्या रेल्वेस्टेशनच्या नुतनीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे १०४ कोटी रुपये खर्च करून हे स्टेशन उभे राहणार आहे. या स्टेशनचे रूप राम मंदिराच्या धर्तीवरच असणार आहे.

अयोध्या रेल्वे स्टेशनचे प्रस्तावित कल्पनाचित्र:

ayodhya railway station artists impression
अयोध्या रेल्वे स्टेशनचे प्रस्तावित कल्पनाचित्र | इंडियन एक्स्प्रेस

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल फोटो अयोध्या रेल्वे स्टेशनचा नसून दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्रस्तावित नुतनीकरणाचे कल्पनाचित्र आहे. अयोध्येच्या रेल्वे स्टेशनच्याही नूतनीकरणास मंजुरी मिळाली असून ते राम मंदिराच्या धर्तीवर साकारले जाणार आहे.

हेही वाचा: शिर्डी साई संस्थानाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी देण्यास नकार दिलाय का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा