Press "Enter" to skip to content

तिरंगा रस्त्यावर अंथरून त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचा व्हायरल व्हिडीओ कुठला? वाचा सत्य!

रस्त्यावर तिरंगा अंथरलेला असून त्यावरून गाड्या चालवल्या जात आहेत. भारताच्या राष्ट्रद्वाजाचा अपमान होत असलेला सदर व्हायरल व्हिडीओ केरळमधील असल्याचे दावे सोशल मीडियातून केले जात आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुभाष परुळेकर आणि जयंत गायकवाड यांनी ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पहिल्या असता १० मार्च २०२० रोजी हाच व्हिडीओ आरिफ अजकिया या ट्विटर हँडलवरून ट्विट झाल्याचे निदर्शनास आले.

मानव अधिकार आणि समाजमाध्यम कार्यकर्ता अशी स्वतःची सांगणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आरिफ यांचे हे ट्विट आहे. त्यात ते लिहितायेत “पाकिस्तानी सैन्याला रणभूमीत भारतीय सैनिकांचा सामना करता येत अन्ही म्हणून अशी फालतू कृत्ये करून पाकिस्तानी जनमानसात भारताविषयी राग तगवत ठेवावा लागतो”

त्याच ट्विटखाली त्यांनी एक स्क्रिनशॉट टाकला आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिलेय “या मोटरसायकल स्वाराला सलाम ज्याने झेंड्यावरून गाडी चालवण्यास नकार दिला आणि बाजूने निघून गेला.”

सदर ट्विटमधून हे समजते की व्हिडीओ पाकिस्तानातील आहे; तरीही खातरजमा करण्यासाठी आम्ही फेसबुकवर उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या व्हिडीओ क्लिपचे बारकाईने निरीक्षण केले असता असे लक्षात आले की व्हिडीओच्या ३ मिनिट ३८ सेकंदाला दिसणाऱ्या व्हॅनवर ‘The Hunar Foundation’ असे लिहिलेले आहे.

Image Credit: Facebook
Source: facebook Screengrab

या आधारे सर्च केले असता ‘द हुनर फौंडेशन’चा पत्ता आम्हाला कराची, पाकिस्तानचा असल्याचे समजले आणि खात्री झाली की हा व्हिडीओ भारतातील नाही.

The Hunar Foundation address
Source: Google

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भारतीय तिरंग्याला रस्त्यावर अंथरून त्यावरून गाड्या जात असलेला व्हायरल व्हिडीओ केरळचा असल्याचे दावे फेक आहेत. सदर व्हिडीओ पाकिस्तानाच्या कराची येथील आहे. तसेच तो आताचा नसून २०२० सालचा किंवा त्याही अगोदरचा आहे.

हेही वाचा: एकादशीचे उपवास केल्याने कॅन्सरचा धोका टळत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा