Press "Enter" to skip to content

पूल ओलांडताना पुरात वाहून गेलेल्या जीपचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ नांदेडचा नाही! वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक चालती जीप पुरात वाहून जात असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडीओ नांदेडमधील हिमायतनगर येथील दुर्घटनेचा असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर हाच व्हिडीओ मध्य प्रदेशातील बैतुल येथील घटनेचा म्हणून शेअर केला जातोय.

बैतूल मध्यप्रदेश नाले में आई बाढ़ में जीप बह गई,,, बैतूल जिले की मुलताई तहसील के ग्राम दातोरा के एक ही परिवार के छह सदस्य बैठे हुए थे गाड़ी में।

Posted by Bhagvat Meena on Wednesday, 13 July 2022

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता युट्यूबवर 4 सप्टेंबर 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओच्या हेडींगमध्ये हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री पटविण्याकरिता किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता ‘एक्स्प्रेस न्यूज चमन’ या पाकिस्तानातील न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजवरून 23 मार्च 2020 रोजी हा व्हिडीओ शेअर केला गेला असल्याचे बघायला मिळाले. व्हिडीओसोबतच्या उर्दूमधील कॅप्शननुसार हरनाईजवळील नदीला आलेल्या पुरामुळे एक सुझुकी जीप वाहून गेली मात्र त्यातील प्रवासी थोडक्यात बचावले.

व्हिडिओमधील जीपच्या मागील टायरच्या कव्हरवर बैलाच्या फोटोसह सुझुकी या कंपनीचा लोगो आणि पोटोहार असे लिहिलेले बघायला मिळतेय. याआधारे गुगलवर शोध घेतला असता समजले की सुझुकी पोटोहार ही सुझुकी ऑटोमोबाईल्सची पाकिस्तानमध्ये बनवली जाणारी जीप आहे. पाकिस्तानात ही जीप अतिशय लोकप्रिय आहे.

Potohar jeep comparison

वस्तुस्थिती:

‘चेजपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील पुरात वाहून जाणाऱ्या जीपचा व्हायरल व्हिडीओ नांदेडमधील नसून पाकिस्तानातील आहे. शिवाय फोटो आताचा नसून मार्च 2020 मधील आहे.

हेही वाचा- उड्डाणपुलावर सपासप घसरणाऱ्या बाईक्सचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला? जाणून घ्या सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

FacebookWhatsAppTwitterTelegram

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा