Press "Enter" to skip to content

पेट्रोल पंपावर लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही !

फेसबुकवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ४८ सेकंदाच्या या व्हिडिओत एका पेट्रोल पंपावर एक व्यक्ती गाडीत पेट्रोल भरत आहे. पेट्रोल भरता-भरताच अचानक गाडीने पेट घेतला (fire at petrol pump) आहे. परंतु पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखविल्याने लगेच आग विझवण्यात देखील यश आलेलं व्हिडिओत बघायला मिळतंय. 

Advertisement

हा व्हिडीओ महाराष्ट्रातील किनगाव येथील पेट्रोल पंपावरील असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘बिग न्यूज मराठी’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये व्हिडीओ किनगाव पंपावरील असल्याचा दावा करतानाच मोटारसायकल तसेच मोटारसायकलच्या चावीला सॅनिटायझर न लावण्याचा सल्ला देखील दिला जात आहे. 

किनगांव येथील पंपावर घडलेली घटना गाडीवर सॅनीटायझर लाऊ नये व चावीला पण लाऊ नये.

Posted by BIG News Marathi on Friday, 7 August 2020

अर्काइव्ह पोस्ट

याच कॉपी पेस्ट दाव्यासह इतरही अनेक फेसबुक युजर्स हा व्हिडीओ शेअर करताहेत.

viral video shared on facebook with the location kingaon
Source: Facebook

पेट्रोल पंपावर लागलेल्या आगीचा (fire at petrol pump) हा व्हिडीओ खरंच किनगाव येथील आहे का, यासंबंधी तथ्य तपासणी करण्याची विनंती आमच्या अधिकृत व्हाटसअप नंबरवर करण्यात आली.

पडताळणी :

व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडीओ की फ्रेम्स मध्ये रूपांतरित करून गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला ‘लाईव्ह हिंदुस्तान’च्या वेबसाईटवर या संदर्भातील बातमी वाचायला मिळाली. या बातमीनुसार ही घटना राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील चिडावा येथील आहे.

fire at petrol pump live hindustan news
Source: Live Hindustan

‘पत्रिका’च्या वेबसाईटवर देखील २५ जुलै रोजी या घटनेची बातमी वाचायला मिळाली. या बातमीत देखील सदर व्हिडीओ राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातलाच असल्याचं म्हंटलं आहे.

fire at petrol pump Patrika news
Source: Patrika

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने जर व्यवस्थितपणे समयसूचकता दाखवून आग वीजवली नसती, तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली, असे देखील बातमीत सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ किनगाव येथील नाहीच, पण तो महाराष्ट्रातील देखील नाही.

सदरील घटना २४ जुलै २०२० रोजीची असून राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील चिडावा येथील आहे.

हे ही वाचा-‘दलित मुलीवर मंदिरात बलात्कार’ म्हणत घटनेला फेक गोष्टी जोडून दिला जातोय जातीय रंग!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा