Press "Enter" to skip to content

अमेरिकेने डॉ. मनमोहन सिंह यांचा जगातल्या ५० प्रामाणिक व्यक्तींच्या यादीत समावेश केलाय?

सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय की अमेरिकेने डॉ. मनमोहन सिंह (manmohan singh) यांचा जगभरातल्या सर्वात प्रामाणिक व्यक्तींच्या यादीत (honest list) समावेश केला असून या यादीत समावेश असलेले ते एकमेव भारतीय व्यक्ती आहेत. यादीत मनमोहन सिंह यांचा केवळ समावेशच नाही, तर ते पहिल्या क्रमांकावर असल्याचं देखील सांगितलं जातंय.

Advertisement

काँग्रेस नेते आणि वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे ट्विट केलंय. ट्विटमध्ये मिश्रा म्हणतात,

अमेरिका में जारी दुनिया के 50 सबसे ईमानदार लोगों की सूची में भारत के एक मात्र व्यक्ति डॉक्टर मनमोहन सिंह जी वाे भी पहले स्थान पर.. ।

अर्काइव्ह

राजेश मिश्रा यांचं हे ट्विट ४३०० पेक्षा अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.

अशाच प्रकारचे दावे फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत.

Source: Facebook

पडताळणी:   

  • ‘चेकपोस्ट मराठी’ या दाव्यांची सत्यता पडताळून बघण्यासाठी सर्वप्रथम वेगवेगळ्या किवर्डससह वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर्समध्ये याविषयी काही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अशी कुठलीही यादी आम्हाला बघावयास मिळाली नाही.
  • त्यानंतर आम्ही ‘व्हाईट हाऊस’च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अशी काही यादी मिळतेय का ते शोधलं. परंतु तिथे देखील आमच्या हाती काही लागलं नाही. एक गोष्ट मात्र समजली की अशा प्रकारची कुठलीही यादी अमेरिकेकडून किंवा ‘व्हाईट हाऊस’कडून प्रसिद्ध केली जात नाही.
  • फोर्ब्ज मासिकाने २०१२ साली जगभरातील २० प्रभावशाली राजकारण्यांची यादी जाहीर केली होती, त्यात १९ व्या क्रमांकावर डॉ. मनमोहन सिंह यांचा समावेश करण्यात आला होता. या यादीत त्यावेळी सोनिया गांधी यांचा देखील समावेश होता.

गेल्या वर्षांपासून दरवर्षी व्हायरल होतोय हा दावा

  • यासंबंधीची शोधाशोध करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती अशी की अमेरिकेने मनमोहन सिंह (manmohan singh) यांचा जगातील प्रामाणिक व्यक्तींच्या यादीत (honest list) समावेश केल्याचा हा दावा गेल्या ४ वर्षांपासून जवळपास  प्रत्येक वर्षी व्हायरल होतोय. 
  • २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, नाहुली, ता. जामखेड या पेजवरून देखील हाच दावा करणाऱ्या बातमीची लिंक शेअर करण्यात आली होती. आता मात्र संबंधित वेबसाइटवरून ही बातमी गायब आहे.

देश के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह ,दुनिया के 50 सबसे ईमानदार लोगो की सूची में भारत के एकमात्र व्यक्ति है।

Posted by राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाहुली ता. जामखेड on Thursday, 10 October 2019

२०१८ साली देखील अशाच प्रकारचा दावा करण्यात आला होता.

तेच दावे पंतप्रधान मोदींच्या नावे देखील

  • अशाच प्रकारचे दावे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे देखील करण्यात आले होते. या दाव्यांमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव वापरण्यात आले होते.
Source: Twitter

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या दाव्यांना कुठलाही आधार नाही.

कुणाच्यातरी कल्पनेतून आलेले अशा प्रकारचे दावे कधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नावे, तर कधी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे व्हायरल करण्यात येतात.

वस्तुस्थिती अशी की जगभरातील प्रामाणिक लोकांची कुठलीही यादी अमेरिका किंवा ‘व्हाईट हाऊस’कडून प्रसिद्ध करण्यात येत नाही. किंबहुना तसे करणे शक्य देखील नाही.

हेही वाचा- देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना संघाचे लोक इंग्लंडच्या राणीला सलामी ठोकत होते?

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा