Press "Enter" to skip to content

भव्य शिवलिंग भासणारे ‘ऑस्ट्रीया’चे दृश्य ‘ऑस्ट्रेलिया’चे म्हणून फिरतेय वर्षानुवर्षे!

‘यह है ऑस्ट्रेलिया में वायटर नाम की जगह पे सर्दी की वजह से बना एक बर्फ का गोला. वहां के लोग बच्चों को इसको वैज्ञानिक तौर पर पढाते है की ये क्यों बनता है. अगर वहा भी ब्राह्मण होते तो वहां इसको शिवलिंग का नाम दे कर इसकी पूजा शुरू हो गई होती.’

Advertisement

हे असं टेक्स्ट आणि शेजारी बर्फाचा शिवलिंगासारख्या आकाराचा फोटो एकत्र करून बनवलेली इमेज गेल्या काही वर्षांपासून व्हायरल होतेय.

viral image claiming shivalinga kind of ice structure in Australia
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’ला व्हॉट्सऍप ग्रुप मध्ये ही ईमेज फॉरवर्ड होऊन आल्याचे निदर्शनास आले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्च मधून इमेजची सत्यता शोधल्यावर अनेक गोष्टी समोर आल्या.

गंमत म्हणजे दोन्ही टोकांच्या विचारांचे दावे आम्हाला सापडले. एकात इमेज सोबत वैज्ञानिक दृष्टीकोनास महत्व देत ‘ब्राह्मण तिथे असते तर त्यास शिवलिंग म्हणून त्याची पूजा करत असते’ असे म्हणून ब्राह्मणांवर टीकास्त्र सोडल्याचे आढळले.

तर काही ठिकाणी अनेकांनी या ठिकाणचा फोटो शेअर करत ‘ऑस्ट्रेलियामध्ये शिवलिंग’ म्हणत फेसबुकवरूनच हात जोडलेत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1085847741551421&set=a.578136178989249&type=3&theater

Natural shivling in Australia 💓

Posted by Mahadev Zone on Tuesday, 15 January 2019

वेगवेगळ्या पद्धतीने ईमेज क्रॉप करून रिव्हर्स सर्च केल्यानंतर आम्हाला या ईमेजेस ‘The Eisriesenwelt’च्या असल्याचं समजलं. ‘Eisriesenwelt’ हा जर्मन शब्द असून याचा अर्थ आहे ‘World of the Ice Giants’ म्हणजे ‘बर्फाचे भव्य विश्व’.

ऍटलास ऑबस्क्यूरा’ वर दिलेल्या माहिती नुसार ही जगातली सर्वात मोठी बर्फाची गुहा आहे. ही ‘आईस केव्ह’ तब्बल ४० किलोमीटर एवढ्या लांबीची आहे परंतु यापैकी पर्यटकांना केवळ एक किलोमीटर एवढाच भाग पहायला मिळतो. सर्वात महत्वाचं म्हणजे हे ठिकाण ‘ऑस्ट्रीया’ या देशातील साल्झबर्गजवळ आहे.

‘ऑस्ट्रीया’ हा एक छोटाशा देश असून तो ‘युरोप’ खंडात आहे. इथे जर्मन भाषा बोलली जाते आणि केवळ नामसाधर्म्य असणारा ‘ऑस्ट्रेलिया’ देश हा वेगळ्या अशा ‘ऑस्ट्रेलिया’ खंडात आहे. या दोन्ही देशांमधील हवाई अंतर मोजल्यास तब्बल १४,२०३ किलोमीटर एवढं भरेल.

याहून मजेशीर बाब अशी की फोटोजमध्ये त्या बर्फाचा आकार भलेही शिवलिंगासारखा किंवा घुमटा सारखा दिसत असला तरीही तो वास्तवात तसा नाहीये. एकावर एक दोन माणसं उभे राहून वर जागा शिल्लक राहील एवढा भाग आतून पोकळ आहे.

त्याची बसल्याजागी टूर करण्यासाठी आपण युट्युबवर असणाऱ्या व्हिडीओजचा आधार घेऊ शकता.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की व्हायरल ईमेज मधील दृश्य ‘World of the Ice Giants’ म्हणून ओळखले जाणारे पर्यटनस्थळ आहे. यातील तो बर्फाचा आकार केवळ शिवलिंगाचा भास निर्माण करत आहे, तो आकार आतल्या बाजूने पोकळ आहे.

महत्वाचे म्हणजे दोन्ही टोकांच्या विचारधारेच्या लोकांनी शेअर केलेल्या फोटोतील हे दृश्य ‘ऑस्ट्रेलिया’तील नसून ‘ऑस्ट्रीया’मधील आहे.

हेही वाचा: ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामागे चमत्कार नसून विज्ञान आहे

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा