Press "Enter" to skip to content

ऑक्सिजन सिलिंडर घेऊन मोटार सायकलवरून हॉस्पिटलकडे चाललेल्या महिलेचा फोटो भारतातला नाही!

सोशल मीडियावर हातात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन मोटार सायकलवरून हॉस्पिटलकडे चाललेल्या कोरोना संक्रमित महिलेचा फोटो (covid patient with oxygen cylinder) व्हायरल होतोय. या महिलेच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर देखील दिसतोय. देशभरातल्या बहुतेक सर्वच राज्यातील ऑक्सिजनच्या अभूतपूर्व टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा फोटो भारतातीलच असल्याचा दावा केला जातोय. 

Advertisement

बिहारमधील जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष आणि माजी खासदार पप्पू यादव यांनी हा फोटो शेअर करताना बिहारमधील आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. पटनामधील आगमगुआ येथील एका कार्यकर्त्याने आपणास हा फोटो पाठविला असल्याचे सांगतानाच हा फोटो बिहारच्या आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

ये तस्वीर बेहद मार्मिक और हृदयविदारक है, जो पटना के आगमकुआँ के एक साथी ने हमें भेजी है। यह तस्वीर बिहार की स्वास्थ्य…

Posted by Rajesh Ranjan on Monday, 19 April 2021

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विशाल चौधरी यांनी देखील हा फोटो शेअर केलाय. फोटोला त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ असं कॅप्शन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. ‘ढाकापोस्ट’च्या वेबसाईटवरील एका रिपोर्टमध्ये आम्हाला हा फोटो आढळून आला. बंगाली भाषेतील या रिपोर्टच्या मराठी अनुवादासाठी आम्ही गुगल ट्रान्सलेटरचा उपयोग केला. त्यानुसार व्हायरल फोटो बांगलादेशातील बारीसल शहरातील आहे.

‘ढाकापोस्ट’च्या रिपोर्टनुसार बारीसल विद्यापीठाजवळ हिरण पॉईंटवरचा हा फोटो आहे. मोटारसायकलवर बसलेल्या महिलेचे नाव रेहाना परवीन असून ती जियाउल हसन टिटू या आपल्या मुलासोबत हॉस्पिटलमध्ये जात होती. ती महिला एका प्राथमिक शाळेत शिक्षिका असून तिचा मुलगा देखील बँक अधिकारी आहे. सदर महिला कोरोना संक्रमित होती आणि घरीच उपचार सुरु होते, मात्र त्रास जाणवायला लागल्याने नंतर या महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

आम्हाला ‘डीबीसी न्यूज’च्या युट्यूब चॅनेलवर देखील यासंदर्भात एक रिपोर्ट सापडला. या रिपोर्टनुसार अँब्युलन्स उपलब्ध नसल्याने जियाउल हसन टिटू यांना आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी अशा प्रकारची कसरत करावी लागली. मोटारसायकलवरून जवळपास १८ किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर रेहाना परवीन यांना ‘शेर-ए-बांगला’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यानच्या काळात पेशंट महिलेला जवळ ऑक्सिजन सिलेंडर (covid patient with oxygen cylinder) ठेवावा लागला.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो भारतातील नसून बांगलादेशमधील बारिसाल येथील आहे. फोटोत दिसणारी महिला कोरोना संक्रमित असून अँब्युलन्सच्या अनुपलब्धतेमुळे तिच्या मुलाला मोटारसायलवरून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

हे ही वाचा- पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याचा कोरोनावरील घरगुती इलाज ‘WHO’ने स्वीकारल्याचा फेक दावा व्हायरल !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा