Press "Enter" to skip to content

‘तो’ व्हायरल फोटो एकनाथ शिंदे यांचा नाही, अजित पवार यांनी फोन करून केली खात्री!

एकेकाळीचे रिक्षाचालक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या रिक्षाचालक ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रवासाच्या अनेक कथा चर्चिल्या गेल्या आहेत.

Advertisement

अशातच सोशल मीडियावर दाढी असलेला एक तरुण आणि त्याच्या शेजारी रिक्षा असा एक फोटो व्हायरल झालाय. फोटोमधील व्यक्तीचा चेहरा एकनाथ शिंदे यांच्याशी साधर्म्य असणारा आहे. हा एकनाथ शिंदे यांचाच पंचवीस वर्षांपूर्वीचा फोटो असल्याचा दावा अनेकांकडून केला जातोय.

अर्काइव्ह

दरम्यान, फोटोत दिसणारी व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नसून पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे (Baba Kamble) हे आहेत. खुद्द राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच बाबा कांबळे यांना फोन करून हा फोटो त्यांचाच आहे का याबद्दल विचारणा केली होती. त्यावर हा फोटो आपलाच असल्याचे कांबळे यांनी सांगितले आहे.

बाबा कांबळे यांनी अजित पवार यांच्याशी बोलताना सुरूवातीच्या काळात रिक्षाचालक म्हणून केलेल्या कामाची माहिती दिली. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो 1997 सालच्या श्रावण महिन्यात रिक्षा स्टॅंडवर रिक्षाची पुजा केल्यानंतर काढलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी हा फोटो एकनाथ शिंदेंचा म्हणून व्हायरल होत असल्याचे सांगितल्याची माहिती देतानाच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील आपल्याला हा फोटो पाठवला असल्याचेही ते सांगतात.

माझ्या व शिंदेंच्या जुन्या फोटोत साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गैरसमज झाला असावा. एका बातमीसाठी मराठी दैनिकाला माझ्या कार्यालयातून हा फोटो देण्यात आला होता. नंतर तो सोशल मिडियात कसा गेला व फिरला हे, मात्र कळले नाही. पण रिक्षाचालकांत त्याची मोठी चर्चा झाली, असे कांबळे यांनी ‘सरकारनामा‘शी बोलताना सांगितले.

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरेंनी टिळा लाऊन एकनाथ शिंदेंना दिला होता आशिर्वाद? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा