Press "Enter" to skip to content

भाजप आमदाराने ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यास हॉटेलमध्ये केली मारहाण? व्हायरल व्हिडीओ सत्य?

सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. दावा केला जातोय की भाजप आमदार अनिल उपाध्याय (anil upadhyay) यांनी ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यास मारहाण केली.

‘BJP विधायक अनिल उपाध्याय की हिम्मत तो देखिये जब पुलिस का ये हाल है तो आम जनता का क्या होगा…मुबारक हो आप रामराज्य में जी रहे. इस video को इतना वायरल करो की ये पूरा हिन्दुस्तान देख सके..’ या कॅप्शनसह तो व्हिडीओ शेअर केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह लिंक

२०१९ साली अनिल उपाध्याय (anil upadhyay) कॉंग्रेसचे नेते असल्याचे सांगत हाच व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल होत होता.

अर्काइव्ह लिंक

हेच दावे व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओसोबत असणाऱ्या दाव्याच्या आधारे ऍडव्हान्स कीवर्ड सर्च केले आणि व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करूनही पाहिल्या. त्यातून ANI चे ट्विट आम्हाला सापडले.

ANI या वृत्तसंस्थेने २० ऑक्टोबर २०१८ रोजी बातमीसह व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी दिलेल्या बातमीनुसार सदर घटना १९ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली आहे. सब इन्स्पेक्टर एका महिला वकिलासह उत्तर प्रदेश, मेरठमध्ये असणाऱ्या भाजप नगरसेवक मनिष चौधरी यांच्या हॉटेलमध्ये जेवणास गेले होते. तिथे त्यांचा वेटरसोबत काही वाद झाला, याचे पर्यावसन हॉटेल मालक मनिष चौधरी यांच्या व्हायरल व्हिडीओतील मारहाणीत झाले.

याचा अर्थ असा की व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेश नव्हे तर उत्तर प्रदेशातील आहे आणि व्हिडीओतील व्यक्ती कॉंग्रेस नेते अनिल उपाध्याय नसून भाजप नगरसेवक मनिष चौधरी आहेत. यासंबंधी विस्तृत बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत असे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ दोन-अडीच वर्षांपूर्वीचा आहे . यात मारहाण करणारी व्यक्ती अनिल उपाध्याय नसून भाजप नगरसेवक मनिष चौधरी आहेत. त्यांच्यावर या मारहाणप्रकरणी कायदेशीर कारवाई झाली आहे.

हेही वाचा: शेतकरी आंदोलनाला ‘देशद्रोही’ ठरवण्यासाठी भाजप नेत्याने शेअर केला ७ वर्ष जुना फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा