Press "Enter" to skip to content

मोदी आणि योगींसोबत हाथरस प्रकरणातील आरोपीचे वडील? वाचा सत्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या एका व्यक्तीच्या फोटोजचा कोलाज असणारा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की फोटोत भाजप नेत्यांबरोबर दिसणारी व्यक्ती हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी संदीप ठाकूरचे वडील (sandeep thakur father) आहेत. 

Advertisement

‘लाल घेरे में हाथरस के आरोपी संदीप ठाकुर के पिता, इसीलिए रात में ही रेप पीड़िता का अंतिम संस्कार किया गया।।’ या कॅप्शनसह फेसबुक युजर विशाल मेश्राम यांनी सदर फोटोज पोस्ट केले आहेत. या पोस्टला बातमी करेपर्यंत तब्बल ४७३ शेअर्स होते.

Source : facebook

तसेच ‘महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती’ या फेसबुक पेजवर देखील अशाच दाव्यासह महेंद्र वैराग यांनी पोस्ट शेअर केल्याचे आढळले.

Source: facebook

अर्काईव्ह लिंक

ट्विटरवर सुद्धा काही युजर्सने योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटवर रिप्लाय देत हे फोटोज टाकले आहेत. यात नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह या बड्या नेत्यांसह ती व्यक्ती दिसत आहे.

अर्काईव्ह लिंक

हेच दावे याच फोटोजसह व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक मितेश ताके आणि निलेश मालानी यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

फोटोत देशाच्या पंतप्रधानांपासून ते उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रांच्या सोबत दिसणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने हा फोटो शोधला असता आम्हाला डॉ. रिचा राजपूत या ट्विटर युजरचं एक ट्विट मिळालं.

ट्विटमध्ये सांगण्यात आलंय की व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरून हे हाथरस प्रकरणातील आरोपी संदीपचे वडील असल्याचं सांगितलं जातंय. प्रत्येक्षात मात्र हे प्रयागराजमधील उत्तर प्रदेश भाजपचे नेते श्याम प्रकाश द्विवेदी आहेत.

ट्विटर युजरकडून मिळालेल्या या माहितीची खातरजमा करण्यासाठी शयाम प्रकाश द्विवेदी यांचा शोध घेतला. त्यावेळी या नावाचे फेसबुक पेज आम्हास आढळून आले. या अकाउंटवर श्याम प्रकाश द्विवेदी यांचे विविध भाजप नेत्यांसोबतचे फोटोज आम्हाला बघायला मिळाले.

ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून घेण्यासाठी सर्च केले असता लक्षात आले की हे भाजप युवा मोर्चाच्या काशी प्रांताचे उपाध्यक्ष आहेत. सप्टेंबर महिन्यातच झी न्यूज आणि DNAच्या बातम्यांनुसार यांच्यावरही सामुहिक बलात्काराचा आरोप आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागे ‘बलात्काऱ्यांचे भर चौकात पोस्टर्स लावा’ असे आदेश दिले होते तोच धागा पकडत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बलात्काराचे आरोप असणाऱ्या भाजपच्या काही नेत्यांचे फ्लेक्स प्रयागराजच्या चौकात लावले होते. त्याविषयीच्याच या बातम्या आहेत.

आम्हाला अमर उजालाच्या वेबसाईटवर कालच म्हणजे दि. ३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित बातमीनुसार सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी भाजप नेता श्याम प्रकाश द्विवेदीला अटक करण्यात आली असून जेलमध्ये पाठविण्यात आले आहे.

व्हायरल फोटोतील व्यक्ती हाथरस प्रकरणातील आरोपी संदीप ठाकूरचे वडील (sandeep thakur father) नाहीत, हे स्पष्ट झाले तरीही शहानिशा म्हणून आम्ही संदीप ठाकूरच्या वडिलांचा फोटो, नाव काही मिळते का हे शोधण्याचा प्रयत्त्न केला तेव्हा आणखी एक नवी माहिती समोर आली.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार हाथरस प्रकरणातील पिडीत आणि आरोपींच्या कुटुंबाचे दोन दशकांआधीपासूनचे वैर आहे. २०११ साली पिडीत मुलीच्या आजोबांना मारहाण केल्या प्रकरणी आताच्या केसमधील आरोपी रवी आणि संदीप ठाकूरचे वडील नरेंद्र ठाकूर यांनी मारहाण केली होती. त्या प्रकरणी या दोघांना २० दिवसांचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता.

संदीप ठाकुरचे वडील नरेंद्र कसे दिसतात हे पाहण्यासाठी आपण News 24 आरोपींच्या घरच्यांची बाजू ऐकून घेत असतानाची बातमी पाहू शकता.

Hathras Sandeep Thakur father on News 24
Source: Facebook

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल फोटोजमधील व्यक्ती हाथरस प्रकरणातील आरोपी संदीप ठाकूरचे वडील नसून ते काशी येथील भाजप नेता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी आहेत.

यांच्यावरसुद्धा सामुहिक बलात्काराचा आरोप असून कालच प्रयागराज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हे ही वाचा: योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेवरील अंत्यसंस्कार लाईव्ह बघत होते?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा