Press "Enter" to skip to content

पायाला साखळदंड जखडलेली रुग्णशय्येवरील वृद्ध व्यक्ती ‘फादर स्टॅन स्वामी’ नाहीत!

फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांचे काल ५ जुलै २०२१ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले. सोशल मीडियावर अनेकांनी दिवंगत ‘फादर स्टॅन स्वामी’ यांना आदरांजली वाहिली आहे. आदरांजली वाहताना अनेकांनी न्यायपालिकेबद्दल रोष व्यक्त करत एका वृद्ध व्यक्तीला साखळदंडाने रुग्णशय्येवर जखडून ठेवल्याचा फोटो शेअर केलाय.

Advertisement

फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात सर्वात वयस्क आरोपी होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना आजारपणामुळे तळोजा कारागृहातून वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

व्हायरल दावा:

फादर स्टँन स्वामी या मानवतावादी 84 वर्षाचे वयोवृध्द,मानवतावादी सामाजिक कार्यकर्ते यांचा हा फोटो पाहून आपल्याला राग येत नाही का ? हा फोटो पाहून मला संपात येतोय. एवढे आजारी फादर काय पळून जाणार आहेत का ? पुरोगामी भारत देशाला हे शोभत नाही. मोदी सरकारचा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा च्या वतीने जाहीर निषेध..!

अशा कॅप्शन सह ‘होय आम्ही महाराष्ट्रीयन ख्रिस्ती‘ या फेसबुक पेजवर तो फोटो शेअर केला गेलाय.

May be an image of 1 person and text that says "होय, आम्ही महाराष्ट्रीयन खिस्ती 33m फादर स्टॅन स्वामी या मानवतावादी 84 वर्षाचे वयोवृद्ध, मानवतावादी सामाजिक कार्यकर्ते यांचा हा फोटो पाहून आपल्याला राग येत नाही का हा फोटो पाहून मला संपात येतोय. एवढे आजारी फादर काय पळून जाणार आहेत का? पुरोगामी भारत देशाला हे शोभत नाही. मोदी सरकारचा अल्फा ओमेगा खिश्वन महासंघा च्या वतीने जाहीर निषेध..! +"

फेसबुक, ट्विटरवर अनेकांनी तोच फोटो शेअर केलाय.

पडताळणी:

 • मार्क्स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कविता कृष्णन यांचे ट्विट ‘चेकपोस्ट मराठी’च्या बघण्यात आले. या ट्विटमध्ये त्यांनी व्हायरल फोटोत साखळदंडाला जखडलेली वृद्ध व्यक्ती स्टॅन स्वामी नसून उत्तरप्रदेशातील ९२ वर्षीय व्यक्ती असल्याचं सांगितलंय.
 • सोबतच त्यांनी स्टॅन स्वामी यांचा रुग्णालयातील खरा फोटो शेअर केलाय. त्यांच्या शेजारी सेंट झेवियर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारेन्हास (Father Frazer Mascarenhas) हे आहेत.
 • या माहितीची पुन्हा एकदा पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हायरल फोटो गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता NDTVची १३ मे २०२१ रोजी प्रकाशित झालेली बातमी मिळाली.
 • बातमीनुसार फोटोत असणारी व्यक्ती ९२ वर्षीय बाबुराम बलवान सिंह आहे. खुनाच्या गुन्ह्यात ते शिक्षा भोगत आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने दवाखान्यात दाखल केले होते. साखळदंडाने जखडलेला तो फोटो बाहेर आल्यानंतर तुरुंग अधीक्षक अशोक यादव यांना उत्तरप्रदेश (कारागृह) अतिरिक्त महासंचालकांनी निलंबित केले.
 • फादर स्टॅन स्वामी नेमके कोण होते, त्यांचे सामाजिक कार्य काय होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने त्यांना नेमक्या कोणत्या आरोपाखाली अटक केली, त्यासाठी त्यांच्याकडे काय पुरावे होते इत्यादी बाबींविषयी विस्तृतपणे ‘बीबीसी मराठी‘चा रिपोर्ट वाचू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पायाला साखळदंड जखडलेली रुग्णशय्येवरील वृद्ध व्यक्ती दिवंगत ‘फादर स्टॅन स्वामी’ नाहीत. ती वृद्ध व्यक्ती उत्तर प्रदेशातील ९२ वर्षीय गुन्हेगार आहे.

हेही वाचा: प्रत्येक बलात्काऱ्यास थेट फाशी? मोदी सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा