Press "Enter" to skip to content

पंजाबमध्ये ‘आप’ची सत्ता येताच हिंदू साधूंना भर रस्त्यात मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आल्यानंतर हिंदू धर्म संकटात सापडला आहे. नागा साधूला भर रस्त्यात मारहाण केली जातेय. अशा प्रकारचे दावे आणि मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

‘नागा साधु हो अथवा जैन समाज के संत…. जो वस्त्र धारण नहीं करते हैं
यह उनकी अपनी परंपराएं हैं इस तरह का कार्य उचित नहीं है पंजाब में आम आदमी पार्टी का साधु संतों की प्रति रिजल्ट आना चालू हो गया है’

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक धीरज भोसले यांनी ट्विटरप्रमाणेच फेसबुक, व्हॉट्सऍपवर हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्च केल्या असता हाच व्हिडीओ एस के एन्टरटेनमेन्ट या युट्युब चॅनेलवरून २९ ऑगस्ट २०१७ रोजी अपलोड करण्यात आले असल्याचे आढळून आले.

Source: Youtube

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे शोधताना सदर घटनेविषयीची डेली मेलची बातमी आम्हाला मिळाली. डेली मेलच्या वेबसाईटवर १६ ऑगस्ट २०१४ रोजी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Source: Daily Mail

सिंहस्टेशन नावाच्या पोर्टलवरील माहितीनुसार मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात कायदेशीर तक्रार नोंदविण्यात आली होती. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या काळात पंजाबमध्ये अकाली दल-भाजप युतीचे सरकार सत्तेत होते. प्रकाश सिंह बादल हे त्यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार नागा साधूंना मारहाणीचा व्हिडीओ २०१४ सालचा आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा या घटनेशी काहीएक संबंध नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’चे पंजाब सरकार हिंदू विरोधी असल्याचे दर्शविण्यासाठी सदर फेक दावे व्हायरल केले जातायेत.

हेही वाचा: पंजाब मधील ‘आप’ सरकारच्या शपथविधीला सरसंघचालक मोहन भागवत निमंत्रित? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा