Press "Enter" to skip to content

‘न्यूयॉर्क टाईम्स’ने नरेंद्र मोदींची स्तुती करणारी बातमी छापल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिका दौरा केल्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’या (New York Times) नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने त्यांची स्तुती केली. ‘Last, Best Hope of The Earth’ म्हणजेच ‘पृथ्वीसाठी सर्वात शेवटची आणि सर्वोत्तम आशादायी व्यक्ती’ अशा आशयाच्या मथळ्यासह पहिल्या पानावर मोदींच्या फोटोसह बातमी छापल्याचे दर्शवत बातमीच्या इमेज सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement
source: whatsapp

‘जगातील सर्वात जास्त प्रेम मिळालेला आणि सर्वशक्तिशाली नेता आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित आहे’ असेही त्या बातमीत लिहिलेय.

अर्काइव्ह

फेसबुकवर हे दावे पसरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.

FB viral claims
Source: facebook

हीच इमेज व्हॉट्सऍपवरही खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुयोग देशमुख,वाघेश साळुंखे, प्रवीण फडणीस आणि चंद्रकांत बर्वे यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल इमेज व्यवस्थित निरखून पाहिली असता यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो आणि त्यावरील हेडलाईन एकदम स्पष्ट दिसतेय परंतु ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ आणि त्याखालील तारीख वगैरे इतर माहिती अगदीच पुसट दिसत असल्याचे जाणवले. येथेच ही इमेज एडीटेड असल्याची शंका आली आणि आम्ही पडताळणीस सुरुवात केली.

याच इमेजला जर आपण झूम करून पहाल तर लक्षात येईल की (New York Times) वृत्तपत्रावरील तारीख लिहिताना ‘सप्टेंबर’ महिन्याचे स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. ‘September’ लिहिण्याऐवजी ‘Setpember’ असे लिहिले आहे.

Spelling mistake in the month name of new York times viral clipping

तरीही अशी काही बातमी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रसिद्ध केली होती का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही शोधाशोध केली परंतु अशा हेडलाईनची कुठलीही बातमी कोणत्याच वृत्तपत्राने प्रकाशित केली नसल्याचे समोर आले.

न्यूयॉर्क टाईम्सने रविवारी २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क आवृत्तीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय आवृत्तीमध्ये मुख्य पानावर काय बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या हे सुद्धा आम्ही तपासले परंतु यात कुठेही नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) उल्लेखही नाही.

Source: The New York Times

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारी बातमी पहिल्याच पानावर छापल्याचे दर्शवणारी व्हायरल इमेज बनावट आहे. न्यूयॉर्क टाईम्सने २६ सप्टेंबर २०२१ रोजी मोदींविषयी एकही बातमी प्रसिद्ध केली नाही.

हेही वाचा: तुर्कीने नरेंद्र मोदींना जगातील ‘ग्रेट लीडर’ घोषित करत पोस्टाची तिकीटे छापली आहेत?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा