Press "Enter" to skip to content

न्यूयॉर्क टाइम्सने दिली केजरीवाल यांच्या गुजरात रॅलीमध्ये 25 कोटी लोक जमल्याची बातमी?

आम आदमी पक्षाचे योजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी गुजरातमधील अहमदाबाद शहरात रॅली केली. केजरीवाल यांच्या या रॅलीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियात सध्या या रॅलीच्या संदर्भाने कथितरित्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्राच्या बातमीचा म्हणून एक स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Advertisement

व्हायरल स्क्रिनशॉटमधील बातमीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या गुजरातमधील रॅलीत 25 कोटी लोक पोहोचल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या रॅलीमधील गर्दीचा विश्वविक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे. या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करताना दावा केला जातोय की अरविंद केजरीवाल यांनी न्यूयॉर्क टाईम्सला करोडो रुपयांच्या जाहिराती देऊन रॅलीसंदर्भात खोटी बातमी छापून आणली आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही व्हायरल स्क्रिनशॉटमधील बातमी न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी मिळाली नाही, ज्यामध्ये केजरीवाल यांच्या रॅलीमध्ये 25 कोटी लोक सहभागी झाले असल्याचा उल्लेख बघायला मिळेल.

त्यानंतर अधिक शोध घेतला असता आम्हाला पत्रकार राणा अय्युब (Rana Ayyub) यांचे एक ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये राणा अय्युब यांनी सदर स्क्रिनशॉट फेक असल्याचे सांगितले आहे. राणा अय्युब आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की न्यूयॉर्क टाइम्सच काय तर इतरही कोणतीही आंतरराष्ट्रीय माध्यम संस्था आपल्या बातम्यांमध्ये कोटी हा शब्द वापरत नाही.

राणा अयुब यांच्या याच ट्विटला न्यूयॉर्क टाइम्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही रिप्लाय देण्यात आला आहे. या रिप्लायमध्ये न्यूयॉर्क टाईम्सकडून सदर स्क्रिनशॉट फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने अशा प्रकारची कोणतीही बातमी प्रसिद्ध केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच न्यूयॉर्क टाइम्सच्या भारतासंबंधीच्या बातम्यांच्या पेजची लिंक देखील शेअर करण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की न्यूयॉर्क टाइम्सने अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीमध्ये 25 कोटी लोक जमल्याचे आणि हा एक विश्वविक्रम असल्याची बातमी दिलेली नाही. व्हायरल स्क्रिनशॉट फेक आहे. न्यूयॉर्क टाइम्सकडूनच व्हायरल स्क्रिनशॉट फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने नरेंद्र मोदींची स्तुती करणारी बातमी छापल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा