Press "Enter" to skip to content

‘हमे हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए’ म्हणणाऱ्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे दावे फेक!

सोशल मीडियात एक ग्राफिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. ग्राफिकवर एका व्यक्तीचा फोटो दिसतोय. सदर व्यक्ती भाजपशी संबंधित असून एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ‘हमे हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए’ असं म्हणणाऱ्या या व्यक्तीचा ऑक्सिजनच्या अभावी लखनऊमध्ये मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय.

Advertisement
source: facebook

ट्विटरवर देखील असाच दावा केला जातोय. या दाव्यासोबत संबंधित व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करण्यात येतोय, ज्यात ती व्यक्ती ‘सडक नहीं चाहिए, रोटी नहीं चाहिए, मंदिर चाहिए’ (hospital nahi chahiye mandir chahiye) अशा घोषणा देताना दिसतेय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सोशल मीडियावर एडव्हान्सड किवर्ड सर्चची मदत घेतली. आम्हाला रविंदर सिंग नेगी या सोशल मीडिया युजरची फेसबुक पोस्ट मिळाली. या पोस्टमध्ये नेगी यांनी व्हायरल दावा चुकीचा असल्याचं सांगितलंय.

व्हायरल फोटोतील व्यक्ती आपला मित्र जितू गुप्ता असून ते आपल्या निवास्थानी पूर्णपणे ठणठणीत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला नसून ते दिल्लीतील पटपटगंज विधानसभा क्षेत्रातील आपल्या घरी सुखरूप आहेत. ज्या कुणाकडून हे कृत्य करण्यात आलं त्यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचं नेगी यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितलंय.

शर्म आनी चाहिए ऐसे लोगों को जो हिंदू धर्म को बदनाम करने के लिए जिंदा आदमी को मार देते है । ये मेरे परम मित्र जीतू गुप्ता…

Posted by Ravinder Singh Negi on Monday, 17 May 2021

त्यानंतर आम्हाला ट्विटरवर खुद्द जितेंदर गुप्ता यांचाच एक व्हिडीओ मिळाला. या व्हिडीओमध्ये स्वतः गुप्ता यांनीच आपण ठणठणीत असल्याचं सांगितलंय. आपल्या निधनाची बातमी पसरवणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केलाय.

दरम्यान, जितेंदर गुप्ता यांनी 18 मे रोजी सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांबाबत नितीन पालिवाल यांच्या विरोधात मधु विहार पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

जितेंदर गुप्ता यांचा सध्या व्हायरल होत असलेला फोटो ‘स्कुपव्हूप’ या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओमधला आहे. पत्रकार समदिश भाटिया यांनी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेला हजेरी लावून त्या कार्यक्रमाचं रिपोर्टींग केलं होतं. याच व्हिडिओत जितेंदर गुप्ता हे ‘सडक नहीं चाहिए, रोटी नहीं चाहिए, मंदिर चाहिए’ (hospital nahi chahiye mandir chahiye) म्हणताना दिसताहेत. व्हायरल ग्राफिक याच व्हिडिओतील आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे संपूर्णतः चुकीचे आहेत. व्हायरल ग्राफिकमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव जितेंदर गुप्ता असून ते आपल्या दिल्लीतील घरी सुखरूप आहेत. स्वतः गुप्ता यांनीच व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा- इजराईलने लढाऊ विमानाला भारतीय महिला सौम्या संतोषचे नाव दिलेले नाही, व्हायरल फोटो एडिटेड!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा