Press "Enter" to skip to content

‘दीवाना हुआ बादल’ गाणारी ‘ती’ किशोर कुमारांची नात नाही, अस्सल मराठमोळी कलाकार!

सोशल मीडियात ‘काश्मीर की कली’ या चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘दीवाना हुआ बादल’ गाणाऱ्या मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. दावा केला जातोय की व्हिडिओतील मुलगी दिवंगत किशोर कुमार यांची नात (kishore kumar granddaughter) आणि त्यांचे चिरंजीव अमित कुमार यांची मुलगी मुदिता गांगुली आहे. 

Advertisement

स्व.किशोर कुमार की पोती एवं अमित कुमार की पुत्री चौदह वर्षीया मुदिता गांगुली अपनी पारिवारिक परम्परा को आगे बढ़ाते हुए.👍👌

Posted by Akash Limbare on Thursday, 3 September 2020
FB claims about Kishore Kumar's daughter checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी:

सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम व्हिडीओच्या की-फ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्च केलं, त्यावेळी आम्हाला हा व्हिडीओ मनिषा माईणकर सबनीस यांच्या फेसबुक अकाउंटवर मिळाला.

रफी साब आणि आशाजींच्या आवाजातलं ‘दीवाना हुआ बादल’ गाताना अनन्या सबनीस, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

Song 6-Deewana hua baadal A duet of Rafisaab and Asha ji by Ananya Sabnis 🎶

Posted by Manisha Mainkar Sabnis on Wednesday, 15 July 2020

अनन्या ही त्यांची मुलगी असून त्यांचा किशोर कुमार यांच्याशी काहीही संबंध नाही असं माईणकर यांनी सांगितलं आहे. त्यांच्या फेसबुक अकाउंटवर अनन्याचे इतरही व्हिडीओज आम्हाला बघायला मिळाले.

व्हायरल व्हिडिओत गाणाऱ्या मुलीचे नाव मुदिता गांगुली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही मुदिता गांगुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला ‘एनडीटीव्ही इंडिया’वर १ ऑगस्ट २०१५ रोजी ‘गायकी की दुनिया में उतरी किशोर कुमार की पोती’ या हेडलाईनखाली प्रसिद्ध बातमी मिळाली.

बातमीनुसार किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांची मुलगी मुक्तिका गांगुली गायनाच्या क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी १० वर्षाची असलेल्या मुक्तिका हिने आपण संगीत शिकत असून गायनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छित असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

किशोर कुमार यांच्या वाढदिवशी म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी अमित कुमार यांनी ‘बाबा मेरे’ नावाच्या अल्बममधून मुक्तिकाला लाँच केलं होतं. या अल्बममध्ये या बाप-लेकीच्या जोडीने ‘बाबा मेरे’ नावाचं गीत देखील गायलं होतं.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओत अतिशय सुमधुर आवाजात ‘दीवाना हुआ बादल’ गाताना दिसणारी मुलगी किशोर कुमार यांची नात (kishore kumar granddaughter) नसून मुंबई येथील अनन्या सबनीस ही कलाकार आहे.

व्हायरल व्हिडिओत किशोर कुमार यांची नात म्हणून केल्या जाणाऱ्या दाव्यात त्यांच्या नातीचं नाव देखील चुकीचं वापरण्यात आलं आहे. किशोर कुमार यांची नात देखील गायन शिकत असून तिचं नाव व्हायरल दाव्याप्रमाणे मुदिता नसून मुक्तिका आहे.  

हे ही वाचा- गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना बरा होत नाही, सोशल मीडियावरील दावा चुकीचा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा