Press "Enter" to skip to content

‘इस्लाम जिंदाबाद’चे नारे देणारे लाखो मुस्लीम ममता बॅनर्जींच्या राज्याचे नाहीत, व्हायरल दावे फेक!

‘इस्लाम जिंदाबाद’चे नारे देणाऱ्या लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मुस्लीम समुदायाचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील कोलकत्त्याचा (islam zindabad kolkata) असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

ममता की छांव में आज ये रेली कलकत्ता में निकली है ।कल पुरे देश में निकलेंगी तब सिर्फ मोदी याद आयेंगा ।

या कॅप्शनसह १.४२ मिनिटांचा तो व्हिडीओ फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांमध्ये फिरत आहे.

ममता की छांव में आज ये रेली कलकत्ता में निकली है ।कल पुरे देश में निकलेंगी तब सिर्फ मोदी याद आयेंगा ।

Posted by हिंदू धर्म रक्षक on Tuesday, 15 June 2021

सदर व्हिडीओ ट्विटरवर पाकिस्तानी-कॅनडीयन लेखक तारेक फतह यांनी ऑगस्ट २०२० मध्ये शेअर केला होता आणि व्हायरल कॅप्शन इंग्रजीतून लिहिले होते. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे. परंतु डिलीट करेपर्यंत हे ट्विट जवळपास दोन लाख लोकांनी पाहिले होते आणि ५२६८ लोकांनी रीट्विट केले होते.

Source: Archive/Twitter

अर्काइव्ह लिंक

‘सुदर्शन नागरिक पत्रकार’ या सुदर्शन न्यूजशी संबंधित असणाऱ्या पेजवर देखील हा व्हिडीओ शेअर झाला होता.

जेहादियों की बढ़ती तादाद

यह दृश्य कश्मीर या केरल का नहीं है।यह आपकी दुलारी ममता के राज्य बंगाल की राजधानी कोलकात्ता का है। कहां सो रहे हो देशवासियों?? जागो, #समान_नागरिक_कानून और #जनसंख्या_नियंत्रण_कानून की मांग करो।👇👇👇

Posted by सुदर्शन नागरिक पत्रकार on Friday, 28 August 2020

अर्काइव्ह लिंक

फेसबुकवर इतरही अनेक युजर्सने हा व्हिडिओ त्याच कॅप्शनसह पोस्ट केलेला.

Viral FB post to claim video from kolkata checkpost marathi
Source: Facebook

त्याच कॅप्शनसह सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवर व्हायरल होत आहे. असे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन, दत्तू गवाणकर आणि गोविंद भुजबळ यांनी आमच्या 9172011480 या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधून निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

सर्वात आधी आम्ही व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यातच काही महत्वाचे पुरावे आम्हाला सापडले.

१. झेंडा:

व्हायरल व्हिडीओच्या चाळीसाव्या सेकंदाला आपणास एक झेंडा फडकत असलेला दिसतो. हिरवा आणि लाल अशी रंगसंगती असणारा झेंडा कोणत्या देशाचा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्च केले असता लक्षात आले की हा झेंडा बांग्लादेशाच्या झेंड्याशी तंतोतंत जुळत आहे.

flag in viral video is of bangladesh checkpost marathi
Source: Facebook & Google

२. आंदोलक कोण आणि कुठले?

त्याच व्हायरल व्हिडिओमध्ये ५४ व्या सेकंदाला एक आंदोलक फलक घेऊन जाताना दिसतोय. त्याखाली ‘इस्लामी शासनतंत्र छात्र आंदोलन’ असे लिहिलेले आहे. ही नेमकी कुठली संस्था आहे हे तपासण्यासाठी सर्च केले असता याचे ऑफिस बांग्लादेशातील ढाका येथे असल्याचे गुगलने सांगितले.

protester's organization is of Bangladesh checkpost marathi
Source: Facebook & Google

३. आंदोलन कशासाठी?

आंदोलकाच्या हातातील फलक पाहून हे आंदोलन ‘रोहिंग्या’ मुसलमानांवर होत असणाऱ्या अत्याचाराविषयी असल्याचे लक्षात येते. त्या अनुषंगाने काही कीवर्ड्स टाकून सर्च केले असता युट्युबवर १३ सप्टेंबर २०१७ रोजी अपलोड केलेला एक व्हिडीओ आम्हाला मिळाला.

‘द रोहिंग्या पोस्ट’या चॅनलने अपलोड केलेल्या या व्हिडीओखाली काही माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे:

‘म्यानमारच्या राखिन राज्यात रोहिंग्या मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी हजारो इस्लामी आंदोलकांनी बांगलादेशमधील ढाका शहरात असणाऱ्या म्यानमार दूतावासाकडे कूच केली. मागील घोषणेनुसार, इस्लामी पक्षाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास बैतुल मुकर्रम राष्ट्रीय मशिदीसमोर आपला मोर्चा काढला.

काकराईल मोर येथे पोलिसांनी निदर्शकांना रोखले पण शांततानगर चौकात पोलिस बंदोबस्ताचा सामना होईपर्यंत आंदोलन करणार्‍या पक्षातील लोकांनी बॅरिकेड तोडण्यात यश मिळवले आणि पुढे कूच चालू ठेवली.’

‘म्यानमार-रोहिंग्या-ढाका-आंदोलन’ या कडीला जोडत आम्ही अधिकृत बातम्या तपासल्या तेव्हा या संबंधी विस्तृत माहिती देणाऱ्या बातम्या आम्हाला सापडल्या. ज्यामध्ये सदर युट्युब व्हिडीओखाली असलेली माहितीला दुजोरा मिळाला.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की व्हायरल व्हिडीओ पश्चिम बंगालच्या कोलकाता (islam zindabad kolkata) येथील नाही. किंबहुना तो भारताच्या इतर कुठल्या भागातीलही नसून तो बांग्लादेशमधील ढाका शहरात २०१७ साली झालेल्या आंदोलनाचा आहे.

तारेक फतह‘ यांनी बांग्लादेशातील व्हिडीओ क्लिपला कोलकात्याचे म्हणून खोटी माहिती पसरवल्याने कोलकाता पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईस सुरुवात केली आहे.

हेही वाचा: श्रीनगरमधील लाल चौकात फडकला तिरंगा म्हणत भाजप नेते शेअर करताहेत एडिटेड फोटो!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा