Press "Enter" to skip to content

भाजप आमदाराने हटविलेले बॅरीकेड्स नमाज पठणाच्या सुरक्षेसाठी लावले नव्हते, व्हायरल दावे फेक!

मुंबईच्या चारकोप मतदारसंघाचे आमदार भाजप नेते योगेश सागर (Yogesh Sagar) बॅरीकेड्स हटवत पोलिसांशी हुज्जत घालत असतानाची दृश्ये असणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. दावा करण्यात येतोय की हे बॅरीकेड्स शिवसेनेने नमाज पठणाकरिता लावले आहेत. खास त्यासाठी रस्ता बंद केलाय आणि सगळी ट्राफिक व बस मार्ग बदलले गेले आहेत.

Advertisement

Today MLA Yogesh Sagar at kandivali protested against shivsena for closing road for namaz. All traffic including bus diverted or stopped. Raghulila Road.’ या अशा इंग्रजी कॅप्शन सह ४५ सेकंदाचा तो व्हिडीओ व्हायरल होतोय.

ट्विटर, फेसबुकप्रमाणे व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत आहेत.

source: whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शशिकांत कोचीकर, अजित वालावलकर, जगदीश नलावडे, भूषण पराडकर आणि कल्याण केळकर यांनी सदर दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केलीय.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांच्या अनुषंगाने काही कीवर्डच्या आधारे गुगल सर्च केले असता १७ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या विविध बातम्या आम्हाला सापडल्या. बातम्यांनुसार सदर प्रकार खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्या घराबाहेर घडला आहे. यामध्ये कुठेही मस्जिद किंवा नमाजचा उल्लेख नाही.

कॉंग्रेसने महाराष्ट्रातून मजुरांना रेल्वे तिकीट देऊन आपापल्या राज्यात पाठविल्याने देशात कोरोनाचा कहर वाढल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केले होते. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजप नेत्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न चालवला होता. कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते परंतु पोलीस प्रशासनाने यास परवानगी दिली नाही.

Congress protest intimation against gopal shetty news
Source: Mumbai Live

त्यानंतर मुंबई उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू असा कॉंग्रेसने इशारा दिला. यावर दोन पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सावधानता बाळगत ट्राफिक वळवली होती. याच दरम्यान आमदार योगेश सागर यांनी जाऊन ते बॅरीकेड्स हटवत पोलिसांशी हुज्जत घातली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भाजप आमदार योगेश सागर यांनी हटविलेले बॅरीकेड्स मुंबई पोलिसांनी दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लावलेले होते. त्यांचा नमाज, मस्जिद, ईस्लाम अशा कुठल्याच गोष्टीचा काहीएक संबंध नाही. व्हायरल दावे फेक आहेत.

हेही वाचा: कुर्ला स्टेशनच्या फलाटावरील मुस्लीम अंत्ययात्रेच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा