येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात राम मंदिराचा थ्री डी आराखडा (ram mandir 3d model) म्हणत एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
‘ऐसा होगा हमारे प्रभू #श्रीराम का भव्य मंदिर मेरे प्रभु की जन्म भूमि से तिरपाल हट रहा है। भारत नई दिशा मैं आगे बढ रहा है। #आयोध्या करती है आह्वान ,,ठाठ से कर मंदिर निर्माण।’ या अशा कॅप्शनसह व्हिडीओज व्हायरल होतायेत.
‘संघ गीत’ नावाच्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट शेअर झालंय.
हा व्हिडीओ अनेकांनी एकसारखे कॅप्शन देऊन शेअर केलेला आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी व्हिडिओमधील फ्रेम घेऊन रिव्हर्स सर्च करून पाहिले.
शोधाशोध केल्यानंतर आमच्यासमोर २०१४चा एक युट्युब व्हिडीओ समोर आला. ‘Kems Studio – 3D Animation & Rendering Studio’ या युट्युब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर झालेला आहे.
या व्हिडीओच्या ०.५५ सेकांदापासून पुढे आपल्याला व्हायरल व्हिडीओमध्ये वापरलेली दृश्ये दिसतील.
युट्युबवरील हा मूळ व्हिडीओ सुरु होतानाच ‘श्री पार्श्वनाथ नवग्रह ७२ जीनालय तीर्थ’ असे लिहिलेले आहे. यातूनच हे जैन मंदिर असल्याचे स्पष्ट होते.
किंबहुना व्हिडीओमधील मंदिरावर असणारे लांबलचक झेंडे जैन मंदिरावरच पाहायला मिळतात. हिंदू मंदिरावर भगवी पताका असते. जैन मंदिरावरील झेंडे पाहण्यासाठी गुगल सर्च केल्यावर आपणास हे असे झेंडे पाहायला मिळतात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की ‘ऐसा होगा हमारे प्रभू श्रीराम का भव्य मंदिर’ या कॅप्शनसह व्हायरल होणारा मंदिराच्या थ्री डी मॉडेलचा (ram mandir 3d model) व्हिडीओ अयोध्येतील राम मंदिराचा नसून तो एका जैन मंदिराचा व्हिडीओ आहे.
हेही वाचा: भव्य शिवलिंग भासणारे ‘ऑस्ट्रीया’चे दृश्य ‘ऑस्ट्रेलिया’चे म्हणून फिरतेय वर्षानुवर्षे!
[…] […]
[…] […]