Press "Enter" to skip to content

आंदोलक शेतकऱ्यांनी ‘जिओ’च्या टॉवरची जाळपोळ केलेली नाही, व्हायरल व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओत आग लागलेले टॉवर दिसत आहे. दावा केला जातोय की केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी मुकेश अंबानी यांच्यावरील राग व्यक्त करण्यासाठी ‘जिओ’च्या टॉवरला आग लावली (fire in mobile tower) आहे.

Advertisement

आंदोलक शेतकऱ्यांच्या रागामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट होऊन, ते जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले असल्याचा दावा करण्यात येतोय.

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय. होळी पर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन चालत राहिले, तर मुकेश अंबानी यांचं दिवाळं निघेल, असाही दावा देखील केला जातोय.

अभी तो @narendramodi के मालिक अंबानी सिर्फ़ टॉप 10 से बाहर हुआ है और अगर ‘होली’ तक #किसान_आंदोलन चलता रहा तो उसका दिवाला निकल जायेगा।

Posted by Jaan Janu on Tuesday, 29 December 2020

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ आताचा नसून जुना आहे, हे अगदी साध्या निरीक्षणाने आपल्या लक्षात येईल. व्हायरल व्हिडीओत ‘टिक-टॉक’ लिहिलेले बघायला मिळतेय आणि भारत सरकारने ‘टिक-टॉक’वर केव्हाच बंदी आणलेली आहे. म्हणजेच व्हिडीओ सध्याचा नसून जुना आहे, हे इथेच स्पष्ट झाले.

व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या कि-फ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ‘न्यूज १८ लोकमत’च्या वेबसाईटवर २९ जून २०१७ रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीनुसार घटना झारखंडमधील वसंत विहार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंकितपुरम येथील आहे.

‘अमर उजाला’च्या बातमीनुसार मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण होती. मात्र घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवल्याने मोठे नुकसान टळले.

मुकेश अंबानी जगातील दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत का हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती मिळाली. काही ठिकाणी दहा श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश आहे. तर काही ठिकाणी तो नाही. दरम्यान, मुकेश अंबानी हे सध्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नसून त्यांची जागा चीनच्या झोन्ग शांशन यांनी घेतल्याची बातमी मात्र बघायला मिळाली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ‘रिलायन्स जिओ’चे टॉवर जाळलेले (fire in mobile tower) नाही.

व्हायरल व्हिडीओ साधारणतः तीन वर्षांपूर्वीचा असून तो झारखंडमधला आहे. या व्हिडिओचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- भीमा कोरेगावच्या युद्धात लढलेल्या महार सैनिकाचे हे दुर्मिळ छायाचित्र नाही! मग कुणाचे?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा