प्रियांका गांधींच्या नेहरूंबद्दलच्या एका ट्विटचा स्क्रिनशॉट (priyanka gandhi on pandit nehru) आणि त्याखालील कमेंट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. १९३६सालीच कमला नेहरू वारल्या मग पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतरच्या प्रसंग वर्णनात प्रियांका गांधी ‘went to his room to sleep with his wife’ असा उल्लेख कसा काय करत आहेत? या सवालाच्या खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट व्हायरल होतायेत.
फेसबुक युजर ‘राकेश कृष्णन थिय्या’ यांनी “कमला नेहरू १९३६ साली वारल्या, पंडित नेहरू पंतप्रधान बनण्याच्या ९ वर्षे अगोदर मग हा प्रश्न बरोबर नाही का? कुणाच्या बायकोसोबत ते झोपले?” अशा शब्दांत कॅप्शन देत तो स्क्रिनशॉट शेअर केलाय. ही पोस्ट अनेकांनी शेअर केलीय.
फेसबुकवर खूप मोठ्या प्रमाणात हा स्क्रिनशॉट शेअर होत आहे.
हेच दावे अशाच शब्दांत ट्विटरवर देखील व्हायरल होतायेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल स्क्रिनशॉटची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी कमला नेहरू यांच्या मृत्यूची तारीख तपासली. १८ फेब्रुवारी १९३६ रोजी त्याचं निधन झाल्याचं समजलं.
त्यानंतर आम्ही प्रियांका गांधी यांचे मूळ ट्विट शोधून पाहिले. यात सत्याचा उलगडा झाला.
प्रियांका यांच्या मूळ ट्विटमध्ये ‘He covered him with a blanket and slept on an adjacent chair.’ असे शेवटचे वाक्य आहे. म्हणजेच नेहरूंनी त्यांच्या सुरक्षारक्षकाच्या अंगावर पांघरून टाकले आणि ते स्वतः शेजारच्या खुर्चीवर जाऊन झोपले.’ परंतु व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये शेवटच्या वाक्यात छेडछाड करून ‘He covered him with a blanket and went to his room to sleep with his wife’ असे केले आहे. म्हणजेच ‘नेहरूंनी सुरक्षा रक्षकाला पांघरून टाकले आणि ते स्वतःच्या रूममध्ये जाऊन पत्नीसह झोपले’ अशा अर्थाचे वाक्य लिहिले गेले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की प्रियांका गांधींच्या १४ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरूंविषयीच्या ट्विटमध्ये (priyanka gandhi on pandit nehru) छेडछाड करून त्याखाली रिप्लाय लिहून त्या एडिटेड ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल केला गेलाय. मूळ ट्विटमध्ये पत्नीचा उल्लेख कुठेही नाहीये. त्यामुळे कमला नेहरू यांच्या मृत्युच्या वर्षाचा आणि प्रियांका गांधींनी वर्णन केलेल्या प्रसंगाचा काहीएक संबंध नाही.
हेही वाचा: फिरोज गांधी हे ‘गांधी’ नव्हे तर ‘खान’ सांगण्यासाठी फिरवल्या जाणाऱ्या फोटोतून फिरोज गांधीच गायब !
Be First to Comment