Press "Enter" to skip to content

सोनिया गांधींनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी एक रुपयाच्या नाण्यावर अधिकचे चिन्ह छापलेले?

सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस काळात. २००६ साली १ रुपयाच्या नाण्याचे निर्माण केले होते, त्यावर इसाई म्हणजेच ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी अधिकचे चिन्ह छापण्यात आले होते असे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत. (cross on Indian coin)

Advertisement

‘बहुत बडा षडयंत्र है’ अशा कॅप्शनसह ‘RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ‘ आणि ‘आम्ही हिंदुत्ववादी‘ या फेसबुक ग्रुप्सवरून सदर दाव्यांचे ग्राफिक व्हायरल होत आहे. ते इसाई धर्माचेच चिन्ह असल्याची पुष्टी करण्यासाठी रोमन सम्राट लुईस पायस याच्या एका नाण्याचा आधार घेतला आहे.

दोन्ही ग्रुप्सवरील पोस्ट्स बातमी करेपर्यंत जवळपास अडीचशे लोकांनी शेअर केल्या होत्या.

Sonia Gandhi deliberately printed plus sign on the coin to endorse Christianity viral claim
source: facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी रिझर्व बँक ऑफ इंडियाने या (cross on Indian coin) चिन्हा बाबत काय स्पष्टीकरण दिले आहे ते तपासण्याचा प्रयत्न केला.

१. ‘आरबीआय’चे स्पष्टीकरण काय?

आरबीआय‘च्या वेबसाईटवर आजवर छापण्यात आलेल्या सर्व नोटा आणि नाण्यांवरील चिन्हांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यातील माहितीनुसार २००५ साली ‘Unity in Diversity’ म्हणजेच ‘विविधतेत एकता’ या थीम अंतर्गत १, २ आणि १० रुपयांची नवी नाणी पाडण्यात आली होती. यावर असलेल्या उभ्या आणि आडव्या रेषा आणि त्या बाजूला चार बिंदू हे एकतेचे प्रतिक असल्याचे म्हंटले आहे.

RBI explaination about plus sign checkpost marathi fact check
Source: RBI

२. नाणे अभ्यासकांचे मत

इतिहास आणि नाणे अभ्यासक आशुतोष पाटील यांच्याशी आम्ही सदर (cross on Indian coin) दाव्यांविषयी बोललो. त्यावेळी ते काय म्हणाले पहा:

“‘Unity In Diversity’ या थीम अंतर्गत टंकीत केलेल्या नाण्यांवर पुढील बाजूने परिमानाचा अंक, वर्ष, राजमुद्रा आणि वर भारत, India असे लिहिलेले आहे. याच नाण्याच्या मागील बाजूने देवनागरी आणि इंग्रजीत परिमानाचे नाव आणि त्याखाली ‘अधिक चिन्ह आणि त्याबाजूला चार बिंदू’ म्हणजे ‘4 विविध चेहरे आणि एकच शरीर अर्थात भारतात अनेक पद्धतीने विविधता असली तरी आपण सर्व एक आहोत’. असा संदेश या नाण्याच्या माध्यमातून देण्यात आला होता. RBI ने हे सर्व स्पष्ट लिहिलेली प्रेस रिलीज देखील केलेली आहे. RBI च्या वेबसाईट वर आपण वाचू शकाल.”

– आशुतोष पाटील, इतिहास अभ्यासक व नाणे संग्राहक

ऐतिहासिक संदर्भ देताना ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे चिन्ह केवळ रोमन राजानेच नव्हे तर अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केलेल्या आणि 19 व्या शतकापर्यंत चालू असलेल्या काही शिवराई नाण्यांवर देखील असे चिन्ह आपल्याला पहायला मिळते. मुहम्मद अकबर दुसरा याच्या नावे पाडण्यात आलेल्या नाण्यांवर देखील ‘अधिक’चे चिन्ह होते.

Shivrai with plus sign pictures
Courtesy: Ahmed Sheikh/ Kaustubh Palande
coins of muhabbat akbar 2nd
Courtesy: Balkrushna Khandelwal

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (cross on Indian coin) व्हायरल दावे निराधार असल्याचे स्पष्ट झाले. एक रुपयाच्या नाण्यावरील चिन्ह ‘विविधतेत एकता’ या अर्थाने आहे. असे चिन्ह शिवाजी महाराज आणि मुहम्मद अकबर यांच्या काळातही नाण्यांवर वापरले होते. यांचा ख्रिश्चन धर्माशी संबंध लावणे अतार्किक आहे.

हेही वाचा: ‘सोनिया गांधी यांना अँटनिया मायनो म्हणणे गुन्हा नाही’ असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटले आहे?

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा