Press "Enter" to skip to content

मोदींच्या ‘एनिमी प्रॉपर्टी कायद्या’मुळे सोनिया गांधी आणि राजा महमुदाबादचा डाव फसला?

उत्तर प्रदेशातील जवळपास १ लाख कोटीची प्रॉपर्टी सोनिया गांधींच्या कृपेने राजा महमुदाबादला (Mahmudabad Raja) जाणार होती; परंतु नरेंद्र मोदींनी ‘Enemy Property Act’ आणून तो डाव हाणून पाडला, असा दावा सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

काय आहे दावा?

शाबाश मोदी जी –
मोदी जी ने उत्तरप्रदेश के लखनऊ शहर की लगभग 1,00,000 (एक लाख करोड़ रुपये) की प्रॉपर्टी एक पाकिस्तानी के नापाक हाथों से बचाली…

मोदी जी ने Enemy Property Act को President (राष्ट्रपति जी) से पास कराकर राजा महमूदाबाद से लखनऊ की यह प्रापर्टी छुड़वा ली वरना…… कांग्रेस सरकार की इटली की मेडम सोनिया गांधी ने तो पूरा इंतज़ाम कर लिया था कि… लखनऊ की यह प्रॉपर्टी पाकिस्तान की हो जाए …

Full News (सम्पूर्ण विवरण) –
मोदी जी ने यह एक और कार्य देशहित में किया….
आजादी के पन्द्रह साल बाद 1962 में अचानक…. राजा महमूदाबाद लखनऊ से पाकिस्तान भाग गया, …उसके बाद फिर राजा महमूदाबाद का लंदन में निधन हो गया। राजा के निधन के बाद उनका बेटा… “राजा महमूदाबाद आमिर खान” भारत आया और अपनी सम्पत्ति वापस लेने के लिए उसने एक लम्बी क़ानूनी लड़ाई शुरू की।
… 2005 में सुप्रीम कोर्ट ने फैसला देते हुए भारत सरकार और उत्तरप्रदेश सरकार को आदेश दिया कि…. राजा महमूदाबाद की सभी सम्पतियाँ अगर सरकार चाहे तो उन्हें वापस की जाये और इसे किरायेदारों से भी खाली करवाया जाये …
2010 से 2014 में यह बिल स्टँडिंग कमेटी में इटली की मेडम सोनिया गांधी के सहयोग से रखा गया।
इसी बीच 2014 में भारत में सरकार बदल गई और श्री नरेंद्र मोदी जी की नई सरकार ने राष्ट्रपति जी के पास एनिमीज प्रापर्टीज एक्ट में संशोधन के लिए एक आध्यादेश भेजा जिसे… दो दिन पहले ही राष्ट्रपति ने हस्ताक्षर करके कानून बना दिया …
इस आध्यादेश से…. “राजा महमूदाबाद की सारी सम्पत्ति का मालिकाना हक भारत सरकार का हो गया….
राष्ट्रपति का एक हस्ताक्षर.. और एक लाख करोड़ से भी ज्यादा की सम्पति एक झटके में खत्म …
उत्तरप्रदेश के देशद्रोही राजा महमूदाबाद अब फकीर बन गये…
अवध रियासत की सबसे बड़ी एस्टेट महमूदाबाद के राजा आमिर खान रिजवी अब रंक बन गये…
उनकी एक लाख करोड़ की सम्पति सरकार ने एनिमीज प्रापर्टी एक्ट के तहत जप्त कर ली ।
राजा महमूदाबाद की प्रमुख सम्पतियाँ :- 👉
लखनऊ का पूरा हजरतगंज,
बटलर पैलेस,
लखनऊ में एक हजार एकड़ से भी ज्यादा जमीन,
अवध क्लार्क होटल,
नैनीताल का मेट्रोपोल होटल,
दो हजार से ज्यादा एकड़ का आम का बगान,
लन्दन में तीन होटल,
सीतापुर शहर में कई इमारतें और हजारों एकड़ जमीन….

विशेष :- कांग्रेस सरकार की मेडम सोनिया गांधी जी ने राजा महबूदाबाद को उनकी प्रॉपर्टी वापस दिलाने के बदले बीस हजार करोड़ में सौदा किया था ।
जिन मोदी विरोधियों को शंका है, वह गुगल पर जानकारी पढ़ सकते हैं…

एक कोटी भाजप समर्थक, भाजपा सोशल मिडिया वॉर रूम, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, नरेंद्र मोदी २०२४ में भी PM होंगे, RSS स्वयंसेवक संघ या अशा फेसबुक ग्रुप्स आणि पेजेसवरून सदर पोस्ट व्हायरल होत आहे.

FB posts about enemy property act checkpost marathi fact
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेश दुर्गे, प्रशांत यमजाल आणि प्रवीण फडणीस यांनी अशाच प्रकारचे दावे व्हाट्सअपवर देखील व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्ट व्यवस्थित वाचली आणि पडताळणीस सुरुवात केली. पाहूयात एकेक मुद्दा आणि त्याची अधिकृत वस्तुस्थिती:

१. नरेंद्र मोदींनी Enemy Property Act लागू केला का?

नाही. भारत आणि चीन यांच्या दरम्यान १९६२ साली आणि भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ आणि १९७१ सालच्या युद्धानंतर जे लोक भारत सोडून चीन आणि पाकिस्तानात गेले त्यांच्या संपत्तीस शत्रू संपत्ती म्हणजेच Enemy Property असे संबोधण्यात आले. ती संपत्ती भारत सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली. याविषयीचा अधिकृत कायदा १९६८ सालीच तयार करण्यात आला होता.

२. नरेंद्र मोदींनी २०१४ साली राष्ट्रपतींच्या सहीने कायदा मंजूर करून घेतला?

नाही. सदर कायदा १९६८ सालापासूनच लागू आहे. केवळ त्यात काही महत्वपूर्ण बदल मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१७ साली करण्यात आले. The Enemy Property Act, 1968 आणि The Public Premises Act, 1971 यांचे रूप बदलून The Enemy Property (Amendment and Validation) Bill, 2016 मंजूर झाले.

३.. सोनिया गांधी राजा महमूदाबादची मालमत्ता परत करण्याच्या प्रयत्नात होत्या?

जुन्या Enemy Property Act मधील तरतुदी अपुऱ्या पडल्याने राजा महमुदाबादचा (Mahmudabad Raja) मुलगा मोहम्मद अमीर मोहम्मद खान (Mohammad Amir Mohammad Khan) तब्बल ३० वर्षे चाललेली केस जिंकला आणि २१ ऑक्टोबर २००५ रोजी न्यायलयाने ती मालमत्ता त्याला सुपूर्द करण्याचा आदेश दिला.

जर सोनिया गांधी (Sonia Gandhi) राजा महमूदची मालमत्ता परत करण्याच्या प्रयत्नात होत्या हा दावा खरा मानला तर २००५ ते २०१७ या काळात राजाची मालमत्ता सुपूर्द करता आली असती परंतु तसे झाले नाही कारण २ जुलै २०१० साली कॉंग्रेस शासित भारत सरकारने एक अध्यादेश जारी करून २००५ चा न्यायालयाचा निकाल निकामी ठरवला आणि ती मालमत्ता राजाच्या वारसास सुपूर्द केली गेली नाही.

४. मोदी सरकारच्या काळात कायद्यात काय बदल केले गेले?

जुन्या कायद्यानुसार जप्त केलेल्या संपत्तीचा कायदेशीर वारसदाराने, जो भारताचा किंवा शत्रू राष्ट्र नसलेल्या देशाचा नागरिक असेल आणि त्याने त्या संपत्तीवर दावा केला, तर सरकारला त्याची संपत्ती परत द्यावी लागणार अशी तरतूद होती.

राजा महमूदाबाद फाळणीनंतर इराकला गेला आणि नंतर लंडनला स्थायिक झाला. मात्र त्याची पत्नी आणि मुलगा मोहम्मद अमीर मोहम्मद खान भारतातच राहिले. ते काही काळ राजकारणात देखील सक्रीय होते. त्यांनीच या संपत्तीवर दावा केला होता.

नव्या कायद्यान्वये शत्रू संपत्तीवर कुठलाही वारसदार दावा करू शकत नाही, अशी तरतूद केली गेली. त्यामुळे मोहम्मद अमीर मोहम्मद खानला त्या संपत्तीपासून वंचित रहावे लागले.

५. एकट्या राजा महमुदाबादची संपत्ती १ लाख कोटीच्या घरात होती?

नाही, पोस्टमधील दावा चुकीचा आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार संपूर्ण देशातील संपत्ती ज्यास शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले तिची किंमत १ लाख कोटीच्या घरात आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ४४९१, पश्चिम बंगालमधील २७३५, दिल्लीतील ४८७ पाकिस्तानी शत्रूसंपत्ती आणि मेघालयातील ५७, बंगला मधील २९ व दिल्लीतील १२६ चीनी शत्रू संपत्तींचा समावेश आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दावे चुकीचे आहेत. राजा महमूदाबादच्या संपत्तीवरून सोनिया गांधी यांची बदनामी करणे तसेच Enemy Property Act चे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याच्या हेतूने चुकीची माहिती पसरवली जात आहे.

हेही वाचा: सोनिया गांधींनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी एक रुपयाच्या नाण्यावर अधिकचे चिन्ह छापलेले?

More from राजकारणMore posts in राजकारण »

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा