कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसल्यापासून शिवसेनेचे हिंदुत्व बदलले आहे. टिपू सुलतानच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स तर छापलेच वर त्यात बाळासाहेबांच्या खांद्यावर असलेली भगवी शाल हिरवी केली. असे आरोप भाजप नेत्यांनी केले होते, तेच आता सोशल मीडियात व्हायरल होतायेत. (Shivsena Tipu Sultan poster)
‘#शिवसेना अब टिपू सुलतान का जन्मदिन भी मनाएंगी. इस संबंध में जो पोस्टर कुछ जगह पर लगाया गया है, उसमें बालासाहेब ठाकरे जो केसरी रंग की शॉल पहनते थे उसका रंग भी हरा दिखाया गया है।’ या अशा कॅप्शनसह शिवसेना नेत्यांचे फोटो असणारे (Shivsena Tipu Sultan poster) पोस्टर व्हायरल होतेय. यामध्ये शिवसेना लिहिलेल्या शब्दाचा रंग आणि बाळासाहेबांच्या खांद्यावरील शाल देखील हिरव्या रंगत रंगवली आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील यांनी हेच दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगल सर्च केले असता जानेवारी २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या समोर आल्या.
या बातम्यांनुसार भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचा हा पुरावा असल्याचे म्हणाले होते. या आरोपांवर उत्तर देताना हे पोस्टर तयार करणारे शिवसेनेचे मीरा भाईंदर युवा शहर संघटक सलमान हाशमी यांनी ‘एबीपी माझा‘शी बोलताना स्पष्टीकरण देत शिवसेना नेहमीच महापुरुषांच्या स्मृती जागवत असते; यावेळी टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त आम्ही जारी केलेल्या पोस्टरशी छेडछाड करत त्यावरील भगव्या रंगास भाजपने हिरवा केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावरील शाल देखील मूळ पोस्टरवर भगवी असून भाजपच्या पोस्टरवर हिरवी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘इंडिया टुडे‘ने या आरोप-प्रत्यारोपांची बातमी करत शिवसेनेचे मूळ पोस्टर देखील प्रसिद्ध केले होते त्यात आपणास भगवा रंग प्रामुख्याने दिसून येतो.
वरील (Shivsena Tipu Sultan poster) पोस्टरमधील पोस्टरची चौकट, सेना नेत्यांच्या फोटोतील बॅंकग्राउंड, शिवसेनेचे नाव, चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावरील शाल भगव्या रंगाची आहे परंतु व्हायरल फोटोत या सर्व बाबी हिरव्या झाल्याचे दिसतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की टिपू सुलतान जयंतीनिमित्त शिवसेना नेते सलमान हाशमी यांनी बनवलेल्या मूळ पोस्टरमधील भगवा रंग बदलून खोडसाळपणा करत हिरवा केलाय. याचाच आधार घेत भाजप नेत्यांनी आणि नेटकर्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: ठाकरे सरकारने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुस्लीम युवकांना वेतन चालू केल्याचे दावे चुकीचे!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]