Press "Enter" to skip to content

सुमित्रा महाजन गेल्याच्या फेकन्यूजला बळी पडले शशी थरूर, शरद पवार आणि सुप्रिया सुळे

गुरुवारी २२ एप्रिल २०२१ रोजी माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन (sumitra mahajan) यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्या. त्यावर विश्वास ठेवत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी महाजन यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

  • शशी थरूर यांचे ट्विट:
Image
  • शरद पवार यांचे ट्विट:
Image
  • सुप्रिया सुळे यांचे ट्विट:
Image

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी शशी थरूर यांच्या ट्विटला रिप्लाय देऊन सुमित्रा महाजन ठणठणीत असल्याचे सांगत, व्हायरल बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. त्यावर थरूर यांनी श्रद्धांजलीचे ट्विट डिलीट करत फेक न्यूज पसरवणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर खंत व्यक्त केली आणि सुमित्रा महाजन यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा दिल्या.

Advertisement

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट डिलीट केल्याचे आढळले. तिन्ही ट्विट डिलीट करण्यापूर्वी घेतलेले स्क्रिनशॉट याहू न्यूज आणि ‘या‘ ट्विटद्वारे मिळाले.

सुमित्रा महाजन (sumitra mahajan) यांच्या धाकट्या मुलाने मंदार महाजन यांनीही व्हिडीओद्वारे व्हायरल बातमीचे खंडन केले आहे.

बीबीसी मराठी‘ने देखील याविषयी बातमी केली आहे. सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणे आढळून आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे परंतु त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या पर्यंत घडला प्रकार पोहचला असता त्यांनी ANI या वृत्तसंस्थेस प्रतिक्रिया दिली.

“इंदौर प्रशासनाशी खातरजमा न करता माझ्या कथित निधनाची बातमी हे न्यूज चॅनल्स कसे काय पसरवू शकतात? माझ्या भाचीने थरूर यांच्या दाव्यास ट्विटरवर खोडले असले तरी त्यांना खातरजमा केल्याशिवाय बातमी जाहीर करण्याची एवढी काय घाई होती?”

– सुमित्रा महाजन (माजी लोकसभा अध्यक्ष)

हेही वाचा: जिवंत कोरोना रुग्णास मृत घोषित करून जाळायला नेत असल्याचा व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा