Press "Enter" to skip to content

सीरम इन्स्टिट्यूटने 73 दिवसांत कोरोनाची लस मोफत उपलब्ध होणार असल्याच्या बातम्या नाकारल्या!

भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ (serum institute covishield) 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होणार असल्याच्या तसेच भारत सरकारकडून ही लस देशवासियांना मोफत उपलब्ध करून देणार असल्याच्या बातम्या मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी दिल्या आहेत.

कोरोना संकटाच्या काळात भारतासाठी आनंददायक बातमी मिळाली असून केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटकडून 68 कोटी लस खरेदी करणार आहे. तसेच ही लस राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत भारतीयांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

Advertisement

मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील अनेक महत्वाच्या वेबसाईटवर यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक माध्यमांनी आपल्या बातम्यांचा सोर्स सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याने ‘बिझनेस टुडे’ला दिलेली मुलाखत असल्याचं सांगितलं आहे.

news about serum vaccine in 73 days 1
news about serum vaccine in 73 days 2

पडताळणी :

आम्ही सर्वप्रथम ‘बिझनेस टुडे’च्या मुलाखतीवरून माध्यमांमध्ये कोरोना लसीसंदर्भात दावे करण्यात येताहेत, ती मुलाखत शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘बिझनेस टुडे’च्या वेबसाईटवर पी.बी. जयकुमार यांनी रिपोर्ट केलेली बातमी वाचायला मिळाली.

केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या विशेष उत्पादनाची परवानगी देण्यात आली असून लसीच्या मानवी चाचण्या 58 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. चाचणीचा पहिला डोस देण्यात आला असून दुसरा डोस 29 दिवसांनंतर दिला जाणार आहे. दुसरा डोस दिल्यानंतर 15 दिवसानंतर चाचणीचा अंतिम डेटा येईल. त्यानंतर कोविशिल्टला (serum institute covishield) बाजारात आणण्याचा सीरम संस्थेचे विचार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘बिझनेस टुडे’शी बोलताना दिली असल्याचा दावा ‘बिझनेस टुडे’ मधील बातमीत करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य प्रवाहातील बहुतांश माध्यमांनी या रिपोर्टच्या आधारे बातमी दिल्यानंतर आणि ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असल्याचे लक्षात आल्यावर मात्र सीरम इन्स्टिट्यूटकडून यासंदर्भात स्पष्टीकरण जारी करण्यात आलंय.

सीरम इन्स्टिट्यूटने माध्यमांमधील दावे फेटाळून लावत हे दावे पूर्णतः खोटे आणि काल्पनिक असल्याचे सांगितले आहे. सद्यस्थितीत सरकारने इन्स्टिट्यूटला फक्त लसीच्या उत्पादनाची आणि भविष्यातील उपयोगासाठी तिचा साठा करण्याची परवानगी दिली असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.

सिरम आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे टायअप असल्याने सर्व काही ऑक्सफर्डवर अवलंबून आहे. त्यांच्या एस्ट्राझेनेका लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात चालू आहे. तिची प्रतिकारक्षमता आणि प्रभावीपणा सिद्ध झाल्या नंतरच ही लस उपलब्ध करता येईल. असे सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.

वस्तुस्थिती :

‘बिझनेस टुडे’मधील प्रकाशित बातमीच्या आधारे ‘कोविशिल्ड’ ही पहिली भारतीय कोरोना लस 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होणार असल्याचे तसेच केंद्र सरकारकडून ती नागरिकांना मोफत दिली जाणार असल्याच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. मात्र लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटकडूनच हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटकडून हे दावे नाकारण्यात आल्यानंतर ‘बिझनेस टुडे’च्या बातमीत या स्पष्टीकरणाचा देखील समावेश करण्यात आला आहे. इतर ठिकाणी मात्र ही दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही.  

हे ही वाचा- ‘उद्धव ठाकरे पुन्हा टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये’ सांगत माध्यमांनी केली वाचकांची दिशाभूल!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा