Press "Enter" to skip to content

मुस्लिम टेलरकडून कपडे शिवायला आलेल्या हिंदू मुलीशी गैरवर्तन? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक टेलर कपड्याचं माप घेण्याच्या बहाण्याने आपल्याकडे कपडे शिवायला आलेल्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यानंतर बुरखा घातलेली एक महिला टेलरकडे येते. हा टेलर तिच्याशी देखील छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या महिलेने बुरख्याच्या खाली पोलिसांचा गणवेश घातलेला असतो.

Advertisement

अशा प्रकारे सापळा रचून महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या त्या टेलरला अटक केली जाते. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की हा टेलर मुस्लिम असून तो हिंदू महिलांशी गैरवर्तन करतोय. या लोकांची मानसिकता घाणेरडी असून त्यांच्याकडून कपडे शिवू नयेत, कटिंग करू नये तसेच मेहंदी काढून घेण्याचे काम देखील त्यांना देऊ नये, असे आवाहन केले जातेय.

व्हायरल व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला 3RD EYE या युट्यूब चॅनेलवरून 12 मार्च 2022 रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.

व्हिडिओ अपलोड करताना शीर्षकामध्येच देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सामाजिक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देश्याने बनविण्यात आलेला आहे. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील या चॅनेलवरून सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितींवर आधारलेले व्हिडीओची निर्मिती केली जात असल्याची तसेच हे व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने बनविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Source: Youtube

या युट्यूब चॅनेलच्या व्हिडीओ सेक्शनमध्ये अशा प्रकारचे इतरही व्हिडीओ बघायला मिळतात.

3rd eye youtube channel
Source: Youtube

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हिडीओ खऱ्या घटनेचा नसून केवळ जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने या व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओज चुकीच्या दाव्यांसह व्हायरल झाले आहेत. आम्ही वेळोवेळी या व्हिडीओजची पडताळणी केलेली आहे.

हेही वाचा- हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरलाच हार्ट अटॅक आल्याचे दर्शवणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज सोबतचा दावा चुकीचा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा