Press "Enter" to skip to content

होय, कॉंग्रेसने खरंच सावरकरांना समलिंगी म्हंटलं होतं !

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘कॉंग्रेस सावरकरांना समलिंगी म्हणाली होती’ असा दावा केला होता. साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी आशिष शेलार यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल झाला होता. आज सावरकर जयंतीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर या जुन्याच चर्चांच्या कढीला पुन्हा नव्याने ऊत आलाय.

आशिष शेलार यांच्या ट्विट्सपैकी तिसऱ्या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. ज्यामध्ये आशिष शेलार असं म्हणतायेत की “स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुर्दैवाने समलिंगी म्हणणारे नालायक काँग्रेस सध्या तुम्हाला प्रिय वाटतेय. काँग्रेस सावरकरांचा जो इतिहास सांगत आहे तो तुम्हाला प्रिय वाटतोय..? मग आता आम्हाला कसला इतिहास शिकवताय? तुम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावर केव्हाच “इतिहास जमा” झाला आहात”

पडताळणी:

आशिष शेलार यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे आणि काँग्रेस खरोखरच सावरकरांचे समलैंगिक संबंध होते असे म्हणाली होती का? याची पडताळणी करण्यासाठी गुगल सर्च मध्ये ‘सावरकर समलिंगी’ असे कीवर्ड वापरून सर्च केले असता अनेक बातम्या समोर आल्या. त्यापैकी BBC हिंदीच्या बातमीचा स्क्रीनशॉट:

३ जानेवारी २०२०च्या या बातमीत असे म्हटले आहे की, भोपाळ मध्ये झालेल्या ‘कॉंग्रेस सेवादल प्रशिक्षण शिबिरात सावरकरांवर काही मुद्दे मांडले गेले त्यामुळे हे शिबीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.’ शिबिरात ‘वीर सावरकर, कितने वीर’ नावाची पुस्तिका वाटली गेली. या पुस्तिकेत डॉमिनिक लापिए आणि लैरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम एट मिडनाइट’ पुस्तकाचा संदर्भ देत सावरकरांचे नथुराम गोडसे यांच्याशी समलैंगिक संबंध होते असे लिहिले आहे. पुस्तिकेतील त्या पानाचा फोटो:

या मुद्द्यांना प्रत्युत्तर देत भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी आणि सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी कॉंग्रेसचा निषेध केला होता. यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी बचावात्मक पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली की, “इसके बारे में सेवादल से पूछा जाएगा कि इसका सोर्स क्या है, कहा से उन्होंने ये चीज़े ली है. क्योंकि काग्रेंस की संस्कृति किसी का अपमान करने की नही है और न ही हम किसी के प्रति अपत्तिजनक बातें करें.”

वस्तुस्थिती:

आमच्या पडताळणीमध्ये ही बाब खरी निघाली की कॉंग्रेस सेवादलने हा मुद्दा मांडला होता की सावरकरांचे समलैंगिक संबंध होते. परंतु कॉंग्रेस प्रवक्ता पंकज चतुर्वेदी यांनी कॉंग्रेस सेवादलच्या या दाव्याचे ना खंडन केले ना त्याला दुजोरा दिला. या बचावात्मक पावित्र्यामुळे मुख्य कॉंग्रेस पक्ष सेवादलाकडे बोट दाखवत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करताना दिसला. सेवादल हा कॉंग्रेसचा अविभाज्य भाग असल्याने आशिष शेलार यांचा दावा असत्य ठरत नाही. पडताळणीमध्ये दावा वस्तुस्थितीला धरून असल्याचे पुरावे मिळाल्याने ‘चेकपोस्ट’ वर आम्ही त्यास हिरवा कंदील दाखवत आहोत.

हे ही वाचा- उद्धव ठाकरे यांची संपत्ती मोजताना मिडियाची आकडेमोड चुकली

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा