Press "Enter" to skip to content

रा. स्व. संघाची टिंगल उडविण्यासाठी उपरोधिक पोस्टला खरी मानून फिरवताहेत विरोधक !

सोशल मीडियात आज एका पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय आणि त्याचा वापर संघ विरोधक रा. स्व. संघाची आणि अनुयायांची थट्टा करण्यासाठी करताहेत.

‘सरतेशेवटी भक्त लोकांनी मोदीजींची खूप मोठी गोपनीय युद्धनीती सर्वांसमोर आणली. आता चायनीज लोकांना राहण्यासाठी दुसराच ग्रह शोधावा लागणार असं दिसतंय.’ या अशा शब्दात थट्टा करत आमोद दीक्षित या फेसबुक युजरने पोस्टसोबत एक स्क्रीनशॉट जोडलाय.

Advertisement
https://www.facebook.com/photo.php?fbid=4231344420216922&set=a.732181473466585&type=3&theater

तोच स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत राहुल मुखर्जी या युजरने शेलक्या शब्दांत पोस्ट लिहिलीय आणि रा. स्व. संघाची खिल्ली उडवलीये.

‘श्रीनी आर’ असं युजरनेम असलेल्या व्यक्तीने फेसबुकवर लांबलचक ‘वॉव’ लिहून सदर स्क्रीनशॉट शेअर केलाय.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1135516036832890&set=a.124435181274319&type=3&theater

या प्रत्येक पोस्टला जवळपास शे-दोनशे शेअर्स आहेत. यातील मजकूर नव्याने टाईप करून काहींनी पोस्ट केल्याचंही दिसलं.

काय आहे त्या स्क्रिनशॉटमध्ये?

‘माझे काका/मामा रा.स्व.संघाचे कार्यकर्ता असून त्यांनी काल बोलताना मोदिजींची गोपनीय युद्धनीती सांगितली.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणजे वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे तो फक्त एक पुतळा नाहीये. तो वैदिक परंपरेत असलेल्या तंत्रज्ञानातून बनवलेला एक ‘एनरगॉन’ आहे.

जर चीनने आपल्यावर आक्रमण केलं तर मोदिजी फक्त एक बटण दाबतील आणि पटेलांचा पुतळा भल्या मोठ्या रोबो मध्ये रुपांतरीत होईल. जो चायनीज सैन्याला त्याच्या प्लाझमा तोफांनी आणि EMP तंत्राने नेस्तनाबूत करून टाकेल.

या मागचं तंत्रज्ञान फार पुरातन आहे. अमेरिकेने हे तंत्रज्ञान चोरलं आणि आता त्यावर संशोधन करत आहेत. डॉ. माइकल बे हे त्या अमेरिकन संशोधनाचे प्रमुख वैज्ञानिक आहेत आणि डॉ. डॅनी डॅनियल्स त्यांचे सहाय्यक म्हणून काम करत आहेत.’

पडताळणी:

ही व्हायरल पोस्ट ज्यावेळी आमच्या बघण्यात आली त्याचवेळी त्यातील मजकूर वाचून पोस्ट खरी असण्याविषयी किंवा एखाद्याने ती गंभीरपणे लिहिली असेल याविषयी शंका निर्माण झाली.

त्यामुळे आम्ही सर्वात आधी पोस्टकर्ते ‘अजय घोष’ यांची शोधाशोध केली परंतु ते अकाऊंट कुठे सापडलं नाही. मग आम्ही पोस्ट मधील मजकुरात लिहिलेली दोन वैज्ञानिकांची नावे सर्च करून पाहिली.

अशा नावाचे कुठले वैज्ञानिक तर सापडले नाहीत पण या ‘माइकल बे’ नावाचे चित्रपट दिग्दर्शक आम्हाला गवसले. त्यांची प्रोफाईल IMDB वर आपल्याला पहायला मिळेल.

त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘ट्रान्सफॉर्मर्स’ ही चित्रपटांची सिरीज खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये दोन विरुद्ध प्रवृत्तीच्या रोबोंमधील संघर्ष दाखवण्यात आलाय.

Transformers film poster
Source: IMDB

दुसऱ्या वैज्ञानिकाचं नाव दिलंय ‘डॉ. डॅनी डॅनियल्स’ या नावानिशी सर्च केल्यावर आम्हाला डॅनी डॅनियल्स नावाची ‘पॉर्न स्टार’ असल्याचं समजलं. त्यांचीही प्रोफाईल IMDBवर उपलब्ध आहे.

राहिला प्रश्न चीनवर वार कण्याचा आणि वैदिक तंत्रज्ञानाने त्यात काही गोपनीय गोष्टी असण्याचा तर मुळात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा कुणा भारतीय वैदिकशास्त्र माहित असणाऱ्याने नव्हे तर एका चायनीज कंपनीनेच बनवलेला आहे. चायनीज कंपनीने पुतळ्यासाठी काय काय बनवले, किती कामगार कार्यरत होते याचा एक सविस्तर रिपोर्ट ‘आऊटलुक इंडिया’ने दिला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे समोर आले की व्हायरल स्क्रिनशॉट मधील मजकूर उपरोधिक असून त्यात दिलेली वैदिक तंत्रज्ञानाची थिअरी लागू होऊ शकत नाही कारण पुतळा बनवण्यात स्वतः चायनीज कंपनीचा वाटा आहे.

पोस्ट मधील वैज्ञानिकांची नावे खोटी आहेत. माईकल बे हे एक दिग्दर्शक आहेत. त्यांनी बनवलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ चित्रपटातील भल्या मोठ्या रोबोज म्हणजे मशीन मानवांचा आणि सरदार पटेलांच्या पुतळ्याचा बादरायण संबंध लावला जातोय.

सहाय्यक वैज्ञानिक म्हणून दिलेलं नाव तर एका ‘पॉर्नस्टार’चं आहे.

त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा करत उपरोधाने लिहिलेली पोस्ट खरी मानून मोदींचा, संघांचा विरोध करणारे लोक व्हायरल करत आहेत.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंची पाठराखण करणाऱ्यांनी ‘मिरर ईमेज’ म्हणत केलं चुकीचं समर्थन!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा