Press "Enter" to skip to content

‘कॉंग्रेसचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधी साठी देणार’-‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी

‘कॉंग्रेसचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधी साठी देणार’ या हेडिंगसह देण्यात आलेली ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलची बातमी व्हायरल झाली आहे. बातमीचे हेडिंग आणि आतली ह्यांमध्ये गफलत आणि गडबड असल्याचा अनेकांचा दावा आहे.

Advertisement

पडताळणी:

सोशल मिडियावरील दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य आहे का हे तपासण्यासाठी आम्ही ‘सरकारनामा’च्या वेबसाईटवर फेरफटका मारला. ३० मार्च २०२० रोजी ‘सरकारनामा’च्या वेबसाईटवर ही बातमी प्रकाशित झाली असल्याचे आम्हास आढळले. सुरुवातीलाच बातमीचा बातमीचा सारांश देण्यात आलाय. त्यात असं लिहिलंय की ‘कोरोनाच्या निर्मुलनासाठी मदत देऊ इच्छिणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’ या स्वतंत्र बॅंक खात्यात आपली मदत जमा करण्याचे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.’

पुढे बातमी चालू झाल्यावर पहिलेच वाक्य असे आहे की ‘कोरोनाच्या मुकाबल्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा व विधानपरिषदेतील आमदार, तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

पुन्हा बातमीचा शेवट ‘कोरोनाच्या निर्मुलनासाठी मदत देऊ इच्छिणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’ या स्वतंत्र बॅंक खात्यात आपली मदत जमा करण्याचे आवाहन थोरात यांनी केले आहे.’ या थोरात यांच्या आवाहनाने करण्यात आला आहे.

त्यानंतर आम्हाला याच संदर्भातील मराठीत ‘पुढारी’ची आणि इंग्रजीत ‘फ्री प्रेस जर्नल’ची बातमी सापडली.

या दोन्हींही बातम्यांचा सारांश हा की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘काँग्रेस पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य ‘पंतप्रधान सहायता निधी’मध्ये, तर विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये आपलं एक महिन्याचं वेतन देणार आहेत’

वस्तुस्थिती:

‘सरकारनामा’ने ‘काँग्रेस आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन कोरोना निर्मुलनासाठी देणार’ अशा अर्थाची  बातमी लावताना कधी ‘पंतप्रधान निधी’ तर कधी ‘मुख्यमंत्री मदत निधी’ असा उल्लेख केलेला आहे. बातमीच्या कुठल्याच भागाचे एकमेकांशी तारतम्य नाही. इतर वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आलेल्या याच   बातमीशी ज्यावेळी ‘सरकारनामा’ची बातमी पडताळून बघितली त्यावेळी ही बाब अगदी सहज स्पष्ट झाली की बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकसभा आणि राज्यसभा सदस्य ‘पंतप्रधान निधी’मध्ये, तर विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये आपलं एक महिन्याचं वेतन देणार आहेत’. त्यामुळे ‘सरकारनामा’ची ही बातमी वाचकांना गोंधळात टाकणारी आणि त्यांची दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाल्याने तिला आम्ही ‘चेकपोस्ट’वर अडवत आहोत.

हे ही वाचा- होय, कॉंग्रेसने खरंच सावरकरांना समलिंगी म्हंटलं होतं !

More from राजकारणMore posts in राजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा