Press "Enter" to skip to content

संजय राऊत यांनी ‘तालिबान लोकशाहीवर चालणारा’ असे वक्तव्य केले नाही, ‘TV9’ची बातमी फेक!

अफगाणीस्थानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जाविषयी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. त्यावेळी ‘तालिबान (Taiban) संघ लोकशाहीवर चालणारा’ असे वक्तव्य त्यांनी केल्याचे दर्शवणारा ‘TV9 मराठी’ च्या बातमीचा स्क्रिनशॉट सोशलमिडियात व्हायरल होतोय.

Advertisement

‘सत्तेसाठी हिंदुत्वाला अंगावरील धूळ झटकावी इतक्या सहजतेने तिलांजली देणाऱ्या शिवसेनेने उद्या थेट तालिबान्यांशी हातमिळवणी केली तर नवल वाटू नये! मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीवन आता ‘नव तालिबान्यांच्या’ हातात!’

या अशा मजकुरासह ‘TV9 मराठी’ च्या बातमीचा स्क्रिनशॉट वापरून तयार केलेले ग्राफिक्स फेसबुकवर शेअर केले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तारीख जवळ आल्याने ‘मुंबई’चा आवर्जून उल्लेख केल्याचेही दिसते आहे.

Source: Facebook

फेसबुकवरील काही लोकांनी याच स्क्रिनशॉटचा आधार घेत लांबलचक पोस्ट लिहिल्या आहेत आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.

Source: Facebook

हेच दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने दाव्याशी संबंधित कीवर्ड्स टाकून गुगलसर्च केले असता युट्युबवरील ‘TV9 मराठी’ची ती संपूर्ण बातमी सापडली.
  • बातमीच्या ग्राफिक्समध्ये खरोखर ‘तालिबानी संघ हा लोकशाहीवर चालणारा- राऊत’ असेच आहे. म्हणजेच स्क्रिनशॉट एडीट केलेला नाही हे स्पष्ट झाले.
अर्काइव्ह लिंक
  • राऊत यांनी तालिबान (Taliban) विषयी खरोखर असे वक्तव्य केले होते का? हे तपासण्यासाठी आम्ही ‘TV9 मराठी’च्या बातमीतील राऊत यांनी हिंदीमध्ये दिलेली प्रतिक्रिया व्यवस्थित ऐकली. त्यांची प्रतिक्रिया:

पुरे विश्वको चिंता है, अफगाणिस्थानमें क्या होगा? उसका पुरे वर्ल्डमें क्या परिणाम होगा? अमेरिकासे लेकर रशिया तक.. और हिंदुस्तानसे लेकर वहां… एक तो तालिबानी जो लोग है वो ड्रेमोक्रसी मानते नहीं. इस्लामिक ग्रुप है, टेररिस्ट ग्रुप है. जिस तरह से सत्तापर कब्जा किया है, तो हिंदुस्थान को भी सावधान रेहना पडेगा क्योंकी पाकिस्तान तालिबान का हमदर्द है.

– संजय राऊत (शिवसेना नेते, राज्यसभा खासदार)
  • प्रतिक्रिया देत असताना राऊत यांनी ‘तालिबानी जो लोग है वो ड्रेमोक्रसी मानते नहीं‘ हे वाक्य उच्चारताना ‘नही’ या शब्दाचा उच्चार हळू आवाजात केला आहे.
  • त्यांच्या उच्चाराच्या अस्पष्टतेमुळे ‘TV9 मराठी’ची गल्लत झाली असे म्हणायला देखील वाव नाही कारण त्यांच्या प्रतिक्रियेतील मागच्या पुढच्या वाक्यांतून ते कुठेही तालिबान समर्थक असल्याचे जाणवत नाही.
  • सदर प्रतिक्रिया देत असताना ABP, साम, झी २४ तास अशा विविध वृत्तवाहिन्यांचेही बूम दिसत आहेत. या वाहिन्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर कशा प्रकारे बातमी केलीय हे तपासताना आम्हाला ‘झी २४ तास’ची बातमी मिळाली. यातही कुठे ‘राऊत यांनी तालिबानला लोकशाही मानणारा असल्याचे’ दर्शवले नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘तालिबान संघ लोकशाहीवर चालणारा’ अशी प्रतिक्रिया दिली नाही. ‘ एक तो तालिबानी जो लोग है वो ड्रेमोक्रसी मानते नहीं‘ या त्यांच्या प्रतिक्रियेविषयी चुकीची बातमी करत ‘TV9 मराठी’ने तो मजकूर ग्राफिक्समध्ये लिहिला आहे.

त्याच चुकीच्या बातमीचा आधार घेऊन भाजप समर्थक आणि सेना विरोधक राऊत यांच्या विरोधात सोशल मीडियात प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: ‘आयसीएमआर’ किंवा ‘नीती आयोगा’ने मुंबई मॉडेलचं कौतुक केलेलं नाही, ‘टीव्ही ९ मराठी’ची बातमी फेक !

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा