Press "Enter" to skip to content

डॉ. प्रणव मुखर्जींची आजाराशी झुंज सुरूच; मृत्युच्या व्हायरल पोस्ट फेक!

माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रणव मुखर्जी कोव्हीड पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अशात आज सकाळ पासून rip Pranab Mukherjee म्हणत त्यांच्या मृत्युच्या पोस्ट व्हायरल होतायेत.

Source: Facebook

आज सकाळपासून ट्विटरवर #ripPranabMukherjee या हॅशटॅग ट्रेडिंग असून प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहण्यात येतीय.

पडताळणी:

मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रणव यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यानंतर १० ऑगस्ट रोजी आपल्याला कोरोणाची लागण झाल्याची माहिती प्रणव मुखर्जींनी स्वतःहून ट्विट करत दिली.

त्यानंतर अनेक नेत्यांनी, त्यांच्या हितचिंतकांनी प्रणव यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
कोरोना ची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत अनेकजण त्यांना rip Pranab Mukherjee लिहून श्रद्धांजली वाहत आहे. यात प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई आणि स्वाती चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे.

Source: Twitter
Image
Source: Twitter

याविषयी चेकपोस्ट मराठीने पडताळणी केली असता प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजित मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांचे ट्विट दिसून आले’

प्रणव मुखर्जी यांच्या मुलांचे स्पष्टीकरण:

काहीशा उद्विग्न भावनेतूनच त्यांनी ट्विट केले आहे.

‘माझे वडील श्री प्रणव मुखर्जी अजून हयात आहेत आणि परिस्थिती स्थिर आहे. सोशल मीडियावर नामांकित पत्रकारांकडून प्रसारित होणारे कयास व बनावट बातम्यांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की भारतातील मीडिया ही फेक न्यूजची फॅक्टरी बनली आहे.’

तसेच काँग्रेसच्या नेत्या आणि प्रणव यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी देखील माझ्या वडीलांविषयी अफवा पसरवू नका अशा आशयाचे ट्विट केले आहे.

राजदीप सरदेसाई यांचा माफीनामा:

पत्रकार राजदीप सरदेसाई यांना चूक लक्षात आल्या नंतर त्यांनी ट्विट डिलीट केले आणि माफी मागितली.

स्वाती चतुर्वेदी यांचं रीट्विट:

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी श्रद्धांजलीचे ट्विट डिलीट केले आणि शर्मिष्ठा मुखर्जी यांचे ट्विट रीट्विट केलेय. माफी वगैरे मागितल्याचे ट्विट आम्हाला सापडले नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी नुसार हे समोर आले की माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या मुलांनी केलेल्या ट्विट मूळे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असली तरी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोना झाल्याचे सांगत ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने दिली फेक बातमी!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा