Press "Enter" to skip to content

बँक ऑफ चायनाला भारतात येण्यासाठी RBI ने लायसन्स दिल्याची बातमी खरी; पण दोन वर्षे जुनी!

बँक ऑफ चायनाला भारतात सेवा सुरु करण्याची परवानगी देणाऱ्या बातमीच्या आधारे सध्या सोशल मीडियात सरकारला टिकेचं लक्ष्य बनवलं जातंय

‘हे काय मोदिजी? आमच्याकडून चायनीज ऍप अनईन्स्टॉल करून घेतले. अन तुम्ही डायरेक्ट ‘बँक ऑफ चायना’ ईन्स्टॉल केली? भक्तांना असं वारंवार xxxx बनवणे बरोबर नाही.’

अशी पोस्ट फेसबुक युझर विकास अहिरे यांनी लिहिलीये आणि कमेंटमध्ये ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या बातमीची लिंक शेअर केलीय.

Vikas ahire of facebook about RBI grants licence to BOC
Credit: Facebook

फेसबुकवरच शाहेद जी शेख यांनी ‘देश के लोगों को कितना मूर्ख समझोगे? एक ओर बॉयकॉट, एक ओर सरकारी एन्ट्री. उन भक्तों की इज्जत लुटा दी जो काम पर लग गये थे.’ अशा कॅप्शनसोबत ‘इकॉनॉमिक टाईम्स’ची दुसरी एक बातमी शेअर केलीय.

Advertisement
Shahed G Shaikh shares old news of EC
Credit: Facebook

अथर्व कार्वेकर या फेसबुक युझरने सुद्धा विशाल गुंड यांची पोस्ट शेअर केलीये.  विशाल गुंड यांच्या मूळ पोस्टमध्ये त्यांनी ANI ने दिलेली याच संदर्भातील बातमी शेअर केलीये. बातमीसोबत ‘चायना बँक’ची पहिली शाखा मुंबईत सुरु होणार असल्याचंही सांगण्यात आलंय. 

https://www.facebook.com/photo.php?fbid=3320869571336318&set=a.115153895241251&type=3&theater

भारत-चीन सीमेवर वाढलेल्या तणावाच्या वातावरणात सोशल मिडीयावर  ‘बॉयकॉट चायना’ मोहीम चालवण्यात येतेय. मोहिमेंतर्गत अनेकांनी चायनीज ऍप्स डीलीट केलेत. अनेकांनी चीनचे झेंडे जाळून निषेध व्यक्त केला. या अशा वातावरणात ‘बँक ऑफ चायना’ला देशात येण्यासाठी अधिकृत परवानगीच्या बातम्या समोर आल्याने सोशल मिडीयातून मोदी सरकारवर टीकास्त्र डागण्यात यायला लागलं.

पडताळणी:

ANI सारखी मोठी न्यूज एजन्सी, ‘इकॉनॉमिक टाईम्स’ सारखा न्यूजपेपर या बातम्या देत आहेत म्हणजे काहीतरी तथ्य असण्याची शक्यता आहेच पण या तिन्ही बातम्या काहीशा वेगवेगळ्या का आहेत? एकच न्यूजपेपर वेगवेगळ्या हेडलाईनखाली एकच बातमी का देईल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीला सुरुवात केली.

आमच्या पडताळणीत आम्ही या सर्व पोस्टकर्त्यांनी ज्या लिंक्स शेअर केल्यात त्या बातम्या व्यवस्थितरित्या वाचल्या. विकास अहिरे यांनी लिंकमध्ये शेअर केलेल्या बातमीवर आम्ही गेलो.

EC news RBI grants licence to BOC
Credit: Economic Times

बातमीत होतं ‘RBI ने ‘बँक ऑफ चायना’ला भारतात शाखा उघडण्याची परवानगी दिली’. मजकुरात असं लिहिलंय की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भारतात ‘बँक ऑफ चायना’च्या शाखा उघडण्याची परवानगी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मागच्या महिन्यात चीनमधील क्विंगदाओ शहरात झालेल्या SCO समीटच्या वेळी मोदींनी जिनपिंग यांना हे आश्वासन दिलं होतं. त्याचीच पूर्तता म्हणून RBI ने लायसन्सला मंजुरी दिली आहे.’

मागच्या महिन्यात तर लॉकडाऊन होतं. पंतप्रधान देशातच होते. मग ही भेट नेमकी कधी नी कशी झाली हा प्रश्न पडेपर्यंत आमची नजर बातमीच्या तारखेवर गेली आणि प्रश्नांची उत्तरं मिळाली. ही बातमी आहे ४ जुलै २०१८ची.

मग आम्ही शाहेद शेख यांनी शेअर केलेल्या लिंकवर गेलो. या बातमीत असं म्हंटलय की, ‘RBIने बँक ऑफ चायनाला ‘सेकंड स्केड्यूल’ मध्ये समाविष्ट करून घेतलं असून आता ही बँक इतर बँक्स प्रमाणे कामकाजास सुरुवात करू शकते. ‘सेकंड स्केड्यूल’मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, PNB, आणि ICICI या बँक्सचा समावेश आहे.’ ही बातमी आहे १ ऑगस्ट २०१९ची.

नंतर आम्ही विशाल गुंड यांनी ANIच्या ट्विटचा जो स्क्रीनशॉट शेअर केलाय तो शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ते ट्विट सापडलं. पण त्याची तारीख होती ४ जुलै २०१८.

गुंड यांच्या पोस्टमध्ये ‘बँक ऑफ चायना’ची पहली शाखा मुंबईत उघडणार असल्याचंही लिहिलंय. त्याबाबत सर्च करून पाहिलं तर आम्हाला ‘द हिंदू’ची बातमी मिळाली.

‘Bank of China starts India operations’ या हेडलाईन खाली असणाऱ्या बातमीत ‘द हिंदू’ने ‘बँक ऑफ चायना’ची मुंबईत पहिली शाखा उघडली असून कामकाजास सुरुवात झाल्याचंही सांगितलं आहे.

मुंबई शाखेच्या उद्घाटना संदर्भात चीनचे राजदूत ‘सून वेईडॉंग’ याचं ट्विट आम्हाला सापडलं. यात त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाबद्दल आणि भारत-चीनच्या आर्थिक संबंध सुधारण्यावर आनंद व्यक्त केला होता. हे ट्विट आहे १९ मार्च २०१९चं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये वेगवेगळ्या बातम्या आणि त्यांच्या मजकुरानुसार जे सापडलं त्याची कालानुक्रमे मांडणी-

  • ९ जून २०१८ : ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (SCO) समीट झाली. तिथे पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना ‘बँक ऑफ चायना’ भारतात येऊ देण्याची परवानगी आम्ही देऊ असे आश्वासन दिले.
  • ४ जुलै २०१८ : मोदींच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी RBIने ‘बँक ऑफ चायना’स भारतात आपली शाखा उघडण्याचे लायसन्स दिले.
  • १९ मार्च २०१९ : ‘बँक ऑफ चायना’च्या पहिल्या शाखेचे मुंबई येथे उद्घाटन झाले.
  • १ ऑगस्ट २०१९ : RBIने इतर बँकांप्रमाणे ‘बँक ऑफ चायना’स कामकाज करण्याची परवानगी दिली.

या सर्वाचे सार एवढेच की या सगळ्या घडामोडी २०१८ आणि २०१९ या वर्षांत घडलेल्या आहेत. यांचा २०२० वर्षाशी काहीही संबंध नाही. त्यामुळेच शेअर होत असणारे स्क्रीनशॉट, बातम्या बरोबर असल्या तरीही तब्बल २ वर्षे जुन्या आहेत.

हेही वाचा: TikTok ला ‘स्वदेशी’ पर्याय म्हणून तुफान चाललेलं Mitron ऍप मूळचं ‘पाकिस्तानी’!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा