Press "Enter" to skip to content

रिलायन्सने राम मंदिरासाठी सौर ऊर्जा प्लांट दान केलेला नाही, चुकीचे दावे व्हायरल!

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी निधी समर्पण मोहिमेला १५ जानेवारी पासून सुरुवात झाली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून ५ लाख एक रुपयांच्या देणगीने या मोहिमेचा प्रारंभ झाला. सोशल मीडियावर मात्र त्यापूर्वी पासूनच राम मंदिराच्या देणगीच्या संदर्भाने अनेक दावे केले जाताहेत. सध्या रिलायन्स फाउंडेशनने राम मंदिरासाठी सौर उर्जा संयंत्र दान केलं (reliance donation for ram mandir) असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Advertisement

मनोज पारिक आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट केलीये. ही पोस्ट ५१३ युजर्सकडून शेअर करण्यात आलीये.

Source: Facebook

पडताळणी:

रिलायन्सने खरंच राम मंदिरासाठी सौर ऊर्जा प्लांट दान (reliance donation for ram mandir) केला आहे का हे पडताळण्यासाठी आम्ही मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अशा प्रकारची काही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला यासंदर्भातली कुठलीही बातमी वाचायला अगर बघायला मिळाली नाही.

त्यानंतर आम्ही व्हायरल पोस्टचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला नीता अंबानी या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं एक ट्विट बघायला मिळालं. या ट्विटमध्ये दावा करण्यात आलाय की रिलायन्सने राम मंदिरासाठी एक संपूर्ण सौर ऊर्जा प्लांट दान दिलाय आणि त्यामुळेच अंबानी परिवार नजरेत खुपतोय.

अर्काइव्ह पोस्ट

आम्ही कथितरित्या नीता अंबानी यांच्या नावाने चालविल्या जात असलेल्या या ट्विटर हँडलला भेट दिली असता लक्षात आले की हे अकाउंट ट्विटरकडून व्हेरीफाईड नाही. म्हणजेच हे नीता अंबानी यांचं अधिकृत अकाउंट नाही.

आम्ही नीता अंबानी यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट शोधण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की ट्विटरवर नीता अंबानी यांचे अधिकृत अकाउंट नाही. रिलायन्सकडून यासंदर्भात अनेकवेळा स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. यापूर्वी देखील अनेकवेळा नीता अंबानी यांच्या नावाने चालवलेल्या जात असलेल्या ट्विटर अकाउंटवरून अनेक चुकीचे आणि वादग्रस्त दावे केले गेले आहेत.   

रिलायन्सकडून राम मंदिरासाठी सोलार प्लांट दान करण्यात आल्याच्या दाव्याचे देखील रिलायंसकडून खंडन करण्यात आले आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य  विमलेन्द्र मोहन प्रताप मिश्रा यांच्याकडून देखील हे दावे चुकीचे असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की रिलायन्सने राम मंदिरासाठी सौर ऊर्जा प्लांट दान केला असल्याचे दावे चुकीचे आहेत. या दाव्यांना कुठलाही आधार नाही. शिवाय रिलायन्स आणि राम मंदिर ट्रस्ट या दोहोंकडून देखील हे दावे फेक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा- तिरुपती बालाजी मंदिर प्रशासनाने राम मंदिरासाठी एक अब्ज रुपये देणगीची घोषणा केलेली नाही, व्हायरल दावे चुकीचे!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा